AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs New Zealand सामन्यापूर्वी विराट-रोहितकडून न्यूझीलंड संघाचं कौतुक, काय आहे यामागील रणनीती?

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघानी आपआपला पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध गमावला आहे. पण नेट-रनरेटमध्ये न्यूझीलंडपेक्षाही खराब परिस्थिती असणाऱ्या भारतासाठी आजचा विजय अतिशय महत्त्वाचा आहे.

India vs New Zealand सामन्यापूर्वी विराट-रोहितकडून न्यूझीलंड संघाचं कौतुक, काय आहे यामागील रणनीती?
रोहित आणि विराट
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 5:53 PM
Share

दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा यंदाच्या टी -20 विश्वचषकातील (T20 World Cuo 2021) दुसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात काही वेळातच सुरु होणार आहे. सध्या तरी सामन्यापूर्वी दोन्ही संघ आपआपले अंतिम खेळाडू निश्चित करत असतील. आतापर्यंत संघाने निर्णय घेतलाही असू शकतो. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ ज्या संघाविरुद्ध लढण्याची तयारी करत आहे, त्याच संघाचं कौतुक भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहेत.

कोणत्याही संघाचा कर्णधार किंवा महत्त्वाचा खेळाडू प्रतिस्पर्धी संघाबद्दल सामन्यापूर्वी इतके कौतुकाचे बोल बोलतो, यामागे नक्कीच काहीतरी कारण असून शकते. तर रोहित आणि विराटने केलेल्या या कौतुकामागेही नक्कीच नाही रणनीती असणार. कदाचित असे करुन ते न्यूझीलंडचा आत्मविश्वास अतिप्रमाणात वाढवून सामन्यात त्यांच्याकडून चूक होईल अशासाठी हा माईंड गेम खेळत असावे किंवा इतरही कारण यामागे असू शकतं. दरम्यान हे कौतुक त्यांनी स्टार स्पोर्ट्सच्या मुलाखतीत दिलं असून हा व्हिडीओ ट्विटरवरही पोस्ट करण्यात आला आहे.

काय म्हणाले विराट-रोहित?

विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध बोलताना म्हणाला,“न्यूझीलंडचा संघ अशा संघात मोडतो, जो खेळत असताना सहसा कोणती चूक करत नाही. हीच कीवी टीमची सर्वात मोठी ताकद आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी चूका केल्यास तुमचे जिंकण्याचे चान्सेस आपोआपच वाढतात. त्यांनी 2015 आणि 2019 वर्ल्ड कप फायनलपर्यंत मजल मारली. आम्हालाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मात दिली. या साऱ्याचं श्रेय त्याच्या संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंना जात.” तर रोहितच्या मते न्यूझीलंडकडे उत्तम बोलिंग अटॅक असून प्रत्येक फलंदाजाला बाद करण्यासाठी त्यांच्याकडे एक वेगळा प्लान असल्याचंही रोहितने म्हटलं आहे.

आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), टीम सैफर्ट, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.

IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

इतर बातम्या

India vs New Zealand T20 World Cup 2021: भारत आणि न्यूझीलंड संघासाठी करो या मरोची स्थिती, सामन्याला काही तासांतच सुरुवात

T20 World Cup : हार्दिक पंड्याला आणखी एक संधी, NZ विरुद्धच्या सामन्यात जुन्या Playing XI सह टीम इंडिया मैदानात उतरणार?

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’

(Virat kohli and Rohit Sharma Praises team New Zealand before india vs new zealand T20 world Cup match)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…