India vs New Zealand T20 World Cup 2021: न्यूझीलंडचा तगडा विजय, भारताला 8 विकेट्सनी दिली मात

| Updated on: Oct 31, 2021 | 10:36 PM

India vs New Zealand T20 world cup: भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघानी आपआपला पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध गमावला होता. त्यामुळे आजचा विजय दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा असताना न्यूझीलंडने भारताला नमवत गुणतालिकेत पुढचं स्थान गाठलं आहे.

India vs New Zealand T20 World Cup 2021: न्यूझीलंडचा तगडा विजय, भारताला 8 विकेट्सनी दिली मात
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारतीय क्रिकेट संघाची टी -20 विश्वचषकाची (T20 World Cuo 2021) सुरुवात अतिशय खराब झाली असताना आजचा सामना भारतासाठी फार महत्त्वाचा होता. पण या सामन्यातही प्रथम फलंदाजी भारताकडे आली आणि फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे हार्दीकच्या 23 आणि जाडेजाच्या नाबाद 26 धावा सोडता सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. ज्यामुळे केवळ 110 धावा भारताने केल्या आणि न्यूझीलंडसमोर 111 धावांचे सोपे आव्हान ठेवले. जे न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्ये केवळ 2 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि भारताला 8 विकेट्सनी पराभूत केले.

Key Events

भारताला मोठा विजय गरजेचा

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघानी पहिला सामना गमावला असला तरी भारताचा पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने पराभव झाला होता, त्यामुळे नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडची परिस्थिती भारतापेक्षा बरी आहे, त्यामुळे भारताला हा सामना गमावून चालणार नाही, तसंच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकणही महत्त्वाचं आहे.

भारतीय संघात दोन बदल

फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळे मेडिकल टीमने विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे तो हॉटेलमध्ये विश्रांती करणार आहे. त्याच्याजागी इशान किशनला संधी मिळाली आहे. तर एक अष्टपैलू फलंदाज आणि गोलंदाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भुवनेश्वरच्या जागी लॉर्ड शार्दूल मैदानात उतरत आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 31 Oct 2021 10:28 PM (IST)

    IND vs NZ: न्यूझीलंड 8 विकेट्सनी विजयी

    111 धावाचं आव्हान न्यूझीलंडने सहज पार केलं आहे. केवळ 2 विकेट्स गमावत न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला आहे. मिचेलच्या 49 आणि केनच्या नाबाद 33 धावांनी न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

  • 31 Oct 2021 10:16 PM (IST)

    IND vs NZ: मिचेलचं अर्धशतक हुकलं

    दमदार फलंदाजी करणाऱ्या मिचेलची विकेट बुमराहने पटकावली आहे. न्यूझीलंडचे दोन गडी बाद झाले असले तरी त्यांना 44 ओव्हरमध्ये केवळ 15 धावांची गरज आहे.

  • 31 Oct 2021 10:09 PM (IST)

    IND vs NZ: अखेर हार्दीक गोलंदाजीसाठी मैदानात

    बऱ्याच दिवसानंतर अखेर हार्दीक पंड्या गोलंदाजीला आला आहे. तो त्याची पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 31 Oct 2021 10:08 PM (IST)

    IND vs NZ: न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर

    न्यूझीलंडने केवळ एक विकेट गमावली असताना आता 54 चेंडूत केवळ 22 धावांची गरज त्यांना आहे.

  • 31 Oct 2021 10:02 PM (IST)

    IND vs NZ: शार्दूलची महागडी ओव्हर

    सामन्यात स्थान देण्यात आलेल्या शार्दूलला फलंदाजीत खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर गोलंदाजीतही पहिल्याच षटकात त्याने 14 धावा दिल्या आहेत. 10 षटकानंतर न्यूझीलंडचा स्कोर 83 धावा झाला आहे.

  • 31 Oct 2021 09:50 PM (IST)

    IND vs NZ: जाडेजाच्या ओव्हरमध्ये आणखी एक चौकार

    जाडेजा आज अतिशय महाग ठरत असून आठव्या षटकातही केनने त्याला एक चौकार लगावला आहे.

  • 31 Oct 2021 09:48 PM (IST)

    IND vs NZ: मिचेलची दमदार फलंदाजी सुरुच

    मिचेलने जाडेजाच्या ओव्हरमध्ये षटकार, चौकार ठोकल्यानंतर आता शमीच्या ओव्हरमध्येही एक चौकार लगावला आहे.

  • 31 Oct 2021 09:43 PM (IST)

    IND vs NZ: षटकारानंतर दोन चौकार

    जाडेजाची ओव्हर अतिशय महाग पडत असून षटकारानंतर दोन चौकार न्यूझीलंडने लगावले आहेत. त्यामुळे सहाव्या ओव्हरमधून 14 धावा न्यूझीलंडला मिळालेल्या आहेत.

  • 31 Oct 2021 09:41 PM (IST)

    IND vs NZ: न्यूझीलंडने लगावलं कडकडीत षटकार

    सहाव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर जाडेजाला मिचेलने षटकार लगावला आहे.

  • 31 Oct 2021 09:39 PM (IST)

    IND vs NZ: भारताला विकेटची अत्यंत गरज

    अवघ्या 111 धावांचं आव्हान असल्याने भारताला लवकरात लवकर विकेट घेणं गरजेचं आहे. बुमरहाने एक विकेट घेतली असली तरी विल्यमसन ही महत्त्वाची विकेट अजूनही भारताच्या जाळ्यात अडकणं बाकी आहे.

  • 31 Oct 2021 09:37 PM (IST)

    IND vs NZ: भारताला पहिलं यश

    अवघ्या 111 धावांचे आव्हान समोर असताना न्यूझीलंडने उत्तम फलंदाजीने खेळाची सुरुवात केली. पण चौथ्या षटकात बुमराहने मार्टीन गप्टीलची विकेट घेतली आहे.

  • 31 Oct 2021 09:12 PM (IST)

    IND vs NZ: 110 धावांवर भारताचा डाव आटोपला

    सर्वच फलंदाजनी सुमार कामगिरी केल्यामुळे भारताचा डाव 110 धावांवर आटोपला आहे. सर्वाधिक हार्दीकने 23 आणि जाडेजाने नाबाद 26 धावा केल्या आहेत.

  • 31 Oct 2021 09:06 PM (IST)

    IND vs NZ: जाडेजाचा उत्कृष्ट षटकार

    अखेरच्या षटकात जा़डेजा अधिक धावा करेल अशी आशा सर्वांना असून तिसऱ्या चेंडूवर जाडेजाने षचकार ठोकला आहे.

  • 31 Oct 2021 09:04 PM (IST)

    IND vs NZ: 19 षटकं पूर्ण

    19 व्या षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर पाचव्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने चौकार ठोकला आहे. अद्यापही भारताच्या 100 धावा पूर्ण झालेल्या नाहीत.

  • 31 Oct 2021 09:02 PM (IST)

    IND vs NZ: शार्दूल ठाकूर शून्यावर बाद

    शार्दूल ठाकूर एकही धाव न करता तंबूत परतला आहे. बोल्टच्या चेंडूवर मार्टीननेच त्याची कॅच घेतली आहे.

  • 31 Oct 2021 08:58 PM (IST)

    IND vs NZ: सेट बॅट्समन पंड्या बाद

    सर्व गडी एका मागोमाग एक बाद होत असताना टिकून खेळणारा हार्दीक पड्या 23 धावा करुन बाद झाला आहे. बोल्टच्या चेंडूवर गप्टीलने झेल पकडला आहे.

  • 31 Oct 2021 08:41 PM (IST)

    IND vs NZ: पंत त्रिफळाचीत!!!

    शेवटच्या 6 ओव्हर शिल्लक असल्याने 15 व्या ओव्हरमध्ये मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत अॅडम मिल्ने याच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला आहे.

  • 31 Oct 2021 08:36 PM (IST)

    IND vs NZ: पंत-पंड्या जोडीची संयमी खेळी

    4 गडी तंबूत परतले असताना सध्या क्रिजवर असणारे हार्दीक पंड्या आणि ऋषभ पंत संयमी खेळी खेळताना दिसत आहेत. 14 षटकानंतर 67 वर 4 बाद असा भारताचा स्कोर आहे.

  • 31 Oct 2021 08:20 PM (IST)

    IND vs NZ: कोहलीही बाद

    भारताच्या फलंदाजांनी आजही खराब कामगिरीने सुरुवात केली आहे. 11 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीही बाद झाला आहे. इश सोढीच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आहे.

  • 31 Oct 2021 08:17 PM (IST)

    IND vs NZ: ड्रिंक्स ब्रेकपूर्वी सामना न्यूझीलंडच्या पारड्यात

    10 षटकं संपली असून ड्रिंक्स ब्रेक झाला आहे. भारताच्या खात्यात केवळ 48 धावा असून रोहित, राहुल, इशान असे तीन गडी तंबूत परतले देखील आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ सामन्यात पुढे आहे.

  • 31 Oct 2021 08:08 PM (IST)

    IND vs NZ: रोहित शर्मा झेलबाद

    तिसऱ्या षटकात जीवदान मिळाल्यानंतर रोहितला बराच काळ नाही क्रिजवर टिकता आलं. आठव्या ओव्हरमध्ये इश सोढीच्या चेंडूवर मार्टीन गप्टीलने लाँग ऑनला त्याचा झेल टीपला आहे.

    View this post on Instagram

    A post shared by ICC (@icc)

  • 31 Oct 2021 08:02 PM (IST)

    IND vs NZ: रोहितला जीवदान, रितीकाची Cute Reaction

    भारताचे दोन गडी बाद झाले आहेत. पण ही संख्या तीन असती जर तिसऱ्या षटकात रोहित शर्माचा झेल सुटला नसता. दरम्यान या जीवदानावेळी रोहितची पत्नी रितीकाने दिलेली रिएक्शन पाहण्याजोगी होती.

  • 31 Oct 2021 08:00 PM (IST)

    IND vs NZ: केएल राहुल तंबूत परत

    भारतीय खेळाडूंनी आक्रमक अंदाज घेऊन खेळण्यास सुरुवात केली होती. पण हीच गोष्ट भारताला महाग पडली आणि केएल राहुल बाद झाला. 18 धावा करुन साऊदीच्या चेंडूवर डॅरेलनेचं त्याची कॅच घेतली आहे.

  • 31 Oct 2021 07:57 PM (IST)

    IND vs NZ: सहाव्या षटकाची सुरुवात चौकाराने

    भारतीय खेळाडू थोडा आक्रामक अंदाज घेऊन खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलने चौकार लगावला आहे.

  • 31 Oct 2021 07:55 PM (IST)

    IND vs NZ: रोहितने चढवला गिअर

    रोहित शर्माने पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूवर चौकार आणि षटकार लगावला आहे. सामन्यातील पहिला षटकार रोहितनेच ठोकला आहे.

  • 31 Oct 2021 07:52 PM (IST)

    IND vs NZ: राहुलने ठोकला आणखी एक चौकार

    तिसऱ्या षटकात रोहित शर्माला एक जीवदान मिळाल्यावर दोन्ही फलंदाजानी चौथी ओव्हर आरामात खेळले. पण पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर राहुलने चौकार लगावला आहे.

  • 31 Oct 2021 07:45 PM (IST)

    IND vs NZ: हिटमॅन मैदानात

    इशानला सामन्यात संधी दिल्याने ऐरवी सलामीला येणारा हिटमॅन रोहित शर्मा आज वनडाऊन आला आहे.

  • 31 Oct 2021 07:44 PM (IST)

    IND vs NZ: चौकार ठोकून इशान बाद

    विश्वचषकातील पहिलाच सामना खेळणारा इशान किशन केवळ 4 धावा करुन बाद झाला आहे. बोल्टच्या चेंडूवर डॅरिल मिचेलने त्याचा झेल पकडला आहे.

  • 31 Oct 2021 07:42 PM (IST)

    IND vs NZ: इशानने चौकार ठोकत खोललं खातं

    काही चेंडू एकही धाव न घेतल्यानंतर तिसऱ्या षटकाच इशान किशनने चौैकार ठोकत खातं खोललं आहे.

  • 31 Oct 2021 07:39 PM (IST)

    IND vs NZ: भारतीय संघासाठी पहिला चौकार राहुलच्या बॅटमधून

    दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर केएल राहुलने चौकार ठोकत संघाला पहिला चौकार मिळवून दिला आहे.

  • 31 Oct 2021 07:30 PM (IST)

    IND vs NZ: रोहित शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात नाही

    आज संघात सूर्यकुमारच्या जागी इशानला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सलामीवीर म्हणून केएल राहुल आणि इशान मैदानात आले आहेत.

  • 31 Oct 2021 07:17 PM (IST)

    IND vs NZ: भारतीय संघात दोन बदल

    आजच्या सामन्यापूर्वी भारताने दोन महत्त्वाचे बदल केले असून सूर्यकुमारच्या जागी इशानला आणि भुवनेश्वरच्या जागी शार्दूलला संधी दिली आहे. सूर्यकुमार दुखापतीमुळे सामन्यास मुकत आहे.

  • 31 Oct 2021 07:05 PM (IST)

    India vs New Zealand Toss result: न्यूझीलंडने निवडली गोलंदाजी

    विराट कोहलीने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्यामुळे न्यूझीलंडच्या केनने नाणेफेक जिंकत गोलंदाजीता निर्णय़ घेतला आहे.

  • 31 Oct 2021 06:17 PM (IST)

    IND vs NZ Live: भारतीय संघ सामन्यासाठी रवाना

    महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानाकडे रवाना झाला आहे. हॉटेलमधून सर्व संघ बसने मैदानात पोहचत आहे.

  • 31 Oct 2021 05:07 PM (IST)

    IND vs NZ Live: आजचा दिवस ऐतिहासिक

    भारत आणि न्यूझीलंड या सामन्यासाठीचा आजचा दिवस अतिशय विशेष आणि ऐतिहासिक आहे. कारण आजपासून  34 वर्षांपूर्वी म्हणजेच 31 ऑक्टोबर, 1987 रोजी भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील विश्व चषकाच्या सामन्यात नागपूर येथे माजी भारतीय पेसर चेतन शर्मा यांनी न्यूझीलंडच्या तीन फलंदाजाना सलग बाद करत हॅट्रीक घेतली होती.

  • 31 Oct 2021 04:58 PM (IST)

    IND vs NZ: आतापर्यंत टी20

    आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 सामन्यांचा विचार करता एकूण 17 सामने खेळवले गेले आहेत. ज्यातील प्रत्येकी 8 सामने दोघांनी जिंकले असून एक अनिर्णीत सुटला आहे.

  • 31 Oct 2021 04:54 PM (IST)

    IND vs NZ: 2003 पासून भारत पराभूत

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व चषकाटे सामना कायमच न्यूझीलंडच्या दिशेने झुकलेले आहेत. विशेष म्हणजे 2003 नंतर भारताचा एकाही आयसीसी इवेंटमध्ये किवींना पराभूत करता आलेलं नाही. या 18 वर्षात 5 वेळा दोघे आयसीसी स्पर्धांमध्ये समोर आले असताना न्यूझीलंडच जिंकला आहे.

  • 31 Oct 2021 04:48 PM (IST)

    IND vs NZ: आज भारताची दुसरी लढत

    पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध तब्बल 10 विकेट्सनी गमावल्यानंतर आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारतासाठी फार महत्त्वाचा आहे.

Published On - Oct 31,2021 4:46 PM

Follow us
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.