AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’

आपल्या आक्रमक खेळीनंतर आसीफ अलीने त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांसाठी ट्विटरवर एक मजेदार ट्विट केलं आहे. आसिफने आपल्या ट्विटमध्ये चाहत्यांना आणखी काय हवे आहे? असा सवाल केला आहे.

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, 'अजून काही आदेश?'
Asif Ali
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 2:11 PM
Share

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. आधी भारत मग न्यूझीलंड अशा बलाढ्य संघाना मात दिल्यानंतर शुक्रवारी अफगाणिस्तान संघालाही 5 विकेट्सने नमवत गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) सामन्यात पाकने आधी गोलंदाजी करत न्यूझीलंडला 147 धावांवर रोखलं. त्यानंतर 148 धावांचं लक्ष्य पाकने 5 विकेट्सच्या बदल्यात 19 षटकातचं पूर्ण केलं. (‘Aur koi hukam Pakistan’: Asif Ali steals the show after defeating Afghanistan with 4 sixes in over)

सामन्यात नाणेफेक जिंकत पाकने अफगाणिस्तानने फलंदाजीचा थोडा वेगळा निर्णय घेतला. वेगळा यासाठी कारण यंदाच्या विश्वचषकात प्रत्येक संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत आहे. पण अफगाणिस्तानने फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण तो खास चांगाल ठरला नाही. संपूर्ण संघ मिळून केवळ 147 धावाच करु शकला. त्यातही वरची फळी संपूर्णपणे फेल गेली असताना कर्णधार मोहम्मद नबी आणि गुलाबदीन यांनी प्रत्येकी नाबाद 35 धावा करत संघाला किमान 147 धावापर्यंत पोहोचवलं. यावेळी इमाद वसिमने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शाहीन, रौफ, हसन अली आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

148 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने उत्कृष्ट अर्धशतक झळकावत 51 धावा केल्या. त्याला सोबत देत फखर जमानने 30 धावांची खेळी केली. पण संघाला खरी गरज असताना अखेरच्या काही षटकात असीफ अलीने 7 चेंडूत 4 षटकार ठोकत नाबाद 25 धावा केल्या. ज्याच्या जोरावर सामन्यातही त्याने 1 ओव्हर आणि 5 गडी राखून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. असीफ अलीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

…आणखी काही आदेश?

आपल्या आक्रमक खेळीनंतर आसीफ अलीने त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांसाठी ट्विटरवर एक मजेदार ट्विट केलं आहे. आसिफने आपल्या ट्विटमध्ये चाहत्यांना आणखी काय हवे आहे? असा सवाल केला आहे. आसिफने ट्विटमध्ये लिहिले की, “और कोई हुकुम पाकिस्तान? (अजून काही आदेश पाकिस्तान?) इस्लामाबाद युनायटेड आणि माझ्या कठीण काळात ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या सर्वांचे आभार.”

इतर बातम्या

T20 World Cup : मोहम्मद रिझवानची एमएस धोनीशी बरोबरी, पुढच्या सामन्यात विक्रम मोडणार!

T20 World Cup 2021: पाकिस्तानची दमदार हॅट्रीक, सलग तिसऱ्या सामन्यात मिळवला विजय, अफगाणिस्तानला 5 विकेट्सनी दिली मात

T20 World Cup: दिग्गज माजी कर्णधाराने विराटला दिला विजयाचा मंत्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले दोन महत्त्वाचे बदल

(‘Aur koi hukam Pakistan’: Asif Ali steals the show after defeating Afghanistan with 4 sixes in over)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.