AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: दिग्गज माजी कर्णधाराने विराटला दिला विजयाचा मंत्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले दोन महत्त्वाचे बदल

पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे. या सामन्यापूर्वी अनेक दिग्गज भारतीय संघाला आपआपली मत देत आहेत. अशावेळी माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीननेही संघात काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

T20 World Cup: दिग्गज माजी कर्णधाराने विराटला दिला विजयाचा मंत्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले दोन महत्त्वाचे बदल
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 11:19 PM
Share

T20 World Cup 2021: युएईत सुरु असलेल्या टी विश्वचषकात (T20 World Cup 2021) करोडो भारतीयांचे लक्ष भारतीय संघाच्या कामगिरीकडे लागून आहे. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यामुळे भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे आता लक्ष आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढतीकडे लागून आहे. रविवारी (31 ऑक्टोबर) होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघाला अनेक सल्ले दिग्गज क्रिकेटपटू देत असताना आता माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (mohammed azharuddeen) यांनीही एक सल्ला विराटसह संघ व्यवस्थापनाला दिला आहे.

पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर अनेकांनी संघ निवडण्यात चूक झाली असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता अजहरुद्दीन यांनी काही महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला विराटला दिला आहे. अजहरुद्दीन यांनी कू अॅपवर एक पोस्ट लिहित हा सल्ला दिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे,’न्यूझीलंडविरुद्ध खेळताना संपूर्ण शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात काही बदल करणंही गरजेचं आहे. त्यानुसार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) जागी इशान किशन (Ishan Kishan) आणि रवीचंद्रन आश्विन (R Ashwin) यांना संधी देण्यात यावी, असं माझ वैयक्तीक मत आहे.’

दोन्ही संघाना विजय महत्त्वाचा

ग्रुप 2 मध्ये असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाचं रान कऱणार हे नक्की. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा विजय दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या पाकिस्तान पहिल्या स्थानी तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानी असून भारत आणि न्यूझीलंड हे संघ विजयी आणि चांगल्या रनरेटने गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सामना कधी?

भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे.

हे ही वाचा

India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

West Indies vs Bangladesh: ‘UNLUCKY रस्सेल’, नॉनस्ट्राईकवर असतानाही झाला विचित्रपद्धतीने बाद, पाहा VIDEO

India vs New zealand : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धडकी, भारताचं ‘हे’ त्रिकुट उडवणार दाणादाण

(For upcoming india vs new zealand match mohammed azharuddeen suggest some team changes to virat kohli)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.