AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : आयपीएलनंतर विराट-रोहित केव्हा खेळणार पहिला सामना? जाणून घ्या तारीख

India vs Afghanistan Odi Series 2026 : इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेची 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची निवड करण्यात आली आहे.

Team India : आयपीएलनंतर विराट-रोहित केव्हा खेळणार पहिला सामना? जाणून घ्या तारीख
Virat Kohli and Rohit Sharma Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 02, 2026 | 1:08 AM
Share

विराट कोहली याने आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं. विराटने 31 मे रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावलं. विराटने 156 धावांचा पाठलाग करताना नाबाद 75 धावांची खेळी केली आणि आरसीबीला विजयी केलं. आरसीबीची रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची दुसरी वेळ ठरली. आरसीबीने आपल्या मोहिमेचा जबरदस्त शेवट केला. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा याच्या मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्येही पोहचता आलं नाही. मात्र आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सांगता झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार रंगणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कमबॅकची प्रतिक्षा असणार आहे. विराट आणि रोहित हे दोघे टीम इंडियाच्या जर्सीत केव्हा खेळायला उतरणार? याबाबत जाणून घेऊयात.

अफगाणिस्तानचा भारत दौरा

आयपीएलनंतर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. अफगाणिस्तान भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध 1 कसोटी आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. विराट आणि रोहित दोघांनीही कसोटी आणि टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे दोघे आता फक्त एकदिवसीय क्रिकेटच खेळतात. त्यामुळे विराट-रोहित अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसणार आहेत.

सामन्यांचं वेळापत्रक

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 13 जूनपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना विराट आणि रोहित पहिल्या सामन्यात खेळणं अपेक्षित आहेत. मात्र रोहित खेळणार की नाही? हे तेव्हाच स्पष्ट होईल. रोहित फिट असला तरच त्याला एकदिवसीय सामने खेळता येणार असल्याचं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता रोहित खेळणार की नाही? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : शुबमन गिल (कॅप्टन), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा (फिटनेसवर अवलंबून), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पंड्या (फिटनेसवर अवलंबून), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, हर्ष दुबे आणि प्रिंस यादव.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग