AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुष्का शर्माच्या वाढदिवशीच अवनीत कौरच्या फोटोला विराट कोहलीने केलं लाईक, मग झालं असं की…

सोशल मीडियावर युजर्सचं बारकाईने लक्ष असतं. आपले आवडते सेलिब्रेटी कोणाला फॉलो करतात, कोणाला लाईक करतात याकडे लक्ष ठेवून असतात. 1 मे रोजी विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला लाईक केलं आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली. खरं तर या दिवशी अनुष्काचा वाढदिवस आणि तेव्हाच असं घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

अनुष्का शर्माच्या वाढदिवशीच अवनीत कौरच्या फोटोला विराट कोहलीने केलं लाईक, मग झालं असं की...
अवनीत कौर आणि विराट कोहलीImage Credit source: Instagram
| Updated on: May 02, 2025 | 10:37 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली फॉर्मात आहे. आरसीबी संघ प्लेऑफच्या वेशीवर आहे. एका विजयानंतर प्लेऑफमध्ये उडी घेणार आहे. 18व्या पर्वात 18 क्रमांकाची जर्सी घालणारा विराट कोहली कप मिळवून देईल अशी आशा आहे. असं असताना विराट कोहलीची एक गोष्ट चाहत्यांच्या पटकन लक्षात आणि सोशल मीडियावर वणवा पेटला. विराट कोहलीच्या फोटोला अनेक जण लाईक करतात पण त्याने एखाद्याच्या फोटोला लाईक करणं म्हणजे चर्चा तर होणारच ना…1 मे रोजी अभिनेत्री अनुष्का शर्मा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी हे अक्रित घडलं. विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला लाईक केलं. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर धडाधड कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला. त्यानंतर विराट कोहलीने त्या फोटोला डिस्लाइकही केलं. पण हे प्रकरण काही शांत झालं नाही. मग काय रनमशिन विराट कोहलीला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.

विराट कोहलीने काय स्पष्टीकरण दिलं?

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यावर स्पष्टीकरण देत लिहिलं की, ‘मी हे स्पष्टीकरण देऊ इच्छितो की, मी जाणीवपूर्वक त्या फोटोला लाईक केलं नाही. जे काही घडलं ते चुकून झालं होतं. यासाठी मी सर्वांना विनंती करतोी याबाबत कोणताही गैरसमज पसरवू नका. मला समजून घेण्याबाबत सर्वांचे धन्यवाद.’ विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही सर्वात चर्चित जोडी आहे. या दोघांचा शॉर्टमध्ये विरुष्का असं संबोधलं जातं. या दोघांची केमिस्ट्री मैदानात अनेकदा प्रेक्षकांनी पाहिली आहे.

Virat_Clarification

विराट कोहलीचं स्पष्टीकरण

काय आहे पूर्ण प्रकरण?

अभिनेत्री अवनीत कौरने 30 एप्रिलला इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले होते. यात शॉर्ट स्कर्टसह हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला होता. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. अनेकांनी या फोटोला हार्ट असलेला इमोजी टाकला. पण विराट कोहलीने या फोटोला लाईक करताच चर्चांना उधाण आलं. कारण या दिवशी अनुष्काचा वाढदिवस होता. चाहत्यांनी लगेचच विराट कोहलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र याबाबत वेगळ्या चर्चांना फाटा फुटल्याने अखेर त्याला स्पष्टीकरण द्याव लागलं.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?