Virender sehwag: विरेंद्र सेहवागचा मुलगाही क्रिकेटच्या पीचवर, ‘या’ टीमकडून खेळणार, VIDEO

| Updated on: Dec 06, 2022 | 2:38 PM

Virender sehwag: आर्यवीरची बॅटिंग स्टाइल सेम टू सेम सेहवागसारखी, एकदा हा VIDEO बघा....

Virender sehwag: विरेंद्र सेहवागचा मुलगाही क्रिकेटच्या पीचवर, या टीमकडून खेळणार, VIDEO
virender sehwag
Image Credit source: instagram
Follow us on

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागने आपली एक वेगळी ओळख बनवली. आक्रमक फलंदाजीसाठी सेहवाग ओळखला जायचा. सेहवागच्या बॅटिंगसमोर भल्या-भल्या गोलंदाजांची दिशा आणि टप्पा भरकटला. कसोटी क्रिकेटमध्ये सेहवाग काही ऐतिहासिका इनिंग खेळला, त्याची आजही आठवण काढली जाते. सेहवाग क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर आता तो विश्लेषकाच्या भूमिकेत असतो. विरेंद्र सेहवागनंतर आता त्याचा मुलगा आर्यवीर पॅड बांधून तयार आहे. सेहवागचा मुलगा आर्यवीरला दिल्लीच्या टीममध्ये संधी मिळाली आहे.

सोशल मीडियावर आर्यवीरचा व्हिडिओ

आर्यवीरचा विजय मर्चेंट ट्रॉफी, अंडर-16 टुर्नामेंटसाठी दिल्लीच्या स्क्वाडमध्ये समावेश झालाय. आर्यवीरच्या बॅटिंगचा अंदाज वडिलांसारखाच आहे. सोशल मीडियावर आर्यवीरचा एक व्हिडिओ आहे. त्यात तो गोलंदाजांविरुद्ध मोठे हवाई फटके खेळताना दिसतोय. स्पिनर्सविरोधात सेहवाग आक्रमक बॅटिंग करायचा. त्याचा मुलगा सुद्धा तसाच खेळतो.

आर्यवीरला बिहार विरुद्ध नाही मिळाली संधी

विजय मर्चेंट ट्रॉफीमध्ये दिल्लीने बिहार विरुद्धच्या सामन्यात आर्यवीरला संधी दिली नाही. तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. या मॅचमध्ये दिल्लीच्या टीमने कमालीची फलंदाजी केली. ओपनर सार्थक रे ने 104 चेंडूत 128 धावा फटकावल्या.

‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंची मुल सुद्धा क्रिकेटच्या मैदानात

सेहवागच्या मुलाशिवाय अन्य दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं क्रिकेटच्या मैदानात आपलं नशीब आजमवतायत. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सुद्धा मेहनत करतोय. मुंबई नंतर अर्जुन आता गोव्याच्या टीमकडून खेळतोय. अर्जुन मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडचा भाग आहे. संजय बांगर, नयन मोगिंया, राहुल द्रविड यांची मुल सुद्धा क्रिकेट खेळतायत. आर्यवीरही आपल्या वडिलांप्रमाणे मोठ्या लेव्हलवर क्रिकेट खेळेल अशी अपेक्षा आहे. आता त्याला दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कधी संधी मिळणार? त्याची प्रतिक्षा आहे.