क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी… या ठिकाणी फुकटात पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना; मोठी घोषणा

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामना फुकट पाहण्यासाठी खास पर्याय उपलब्ध आहे. सोनी लिव्ह आणि सोनी स्पोर्ट्सवर पैसे देऊन पाहण्याऐवजी, दूरदर्शन स्पोर्ट्स (DD Sports) चॅनेलवर तुम्ही हा रोमांचक सामना विनामूल्य पाहू शकता. डीडी फ्री डिश कनेक्शन असणाऱ्या प्रेक्षकांना टीव्हीवर याचा लाभ घेता येईल.

क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी... या ठिकाणी फुकटात पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना; मोठी घोषणा
India vs New Zealand
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 5:28 PM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरीजचा पहिला सामना उद्या खेळवला जाणार आहे. पाच सामन्याच्या या सीरीजची पहिली मॅच उद्या 4 नोव्हेंबर रोजी बुधवारी ऑकलंडमध्ये होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. उद्या पुन्हा भारतीय संघाचं नेतृत्त्व शुभमन गिल करणार आहे. तर न्यूझीलंडची धुरा मिचेल सेंटनरकडे असणार आहे. हा सामना तुम्हाला फुकट पाहता येणार आहे. त्यासाठी एक पैसाही खर्च करण्याची गरज नाहीये. हा सामना कसा आणि कुठे फ्रि पाहायचा हेच जाणून घेऊया.

भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंडच्या दौऱ्यावरील दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात टी20 इंटरनॅशनल सामन्याची सीरीज भारताने 3.2 ने जिंकली होती. या संपूर्ण सीरीजचे मीडिया राइट्स सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहे. तुम्हाला टीव्हीवर हा सामना पाहायचा असेल तर सोनी स्पोर्ट्सवर जावं लागेल. जर तुम्हाला मोबाईलवर हा सामना पाहायचा असेल तर सोनी लिव अॅपवर जाऊ शकता. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेटवर सुद्धा तुम्ही सोनी लिवच्या माध्यमातून सामना पाहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही ना काही खर्च करावा लागणार आहे. मॅच पाहायची असेल तर तुम्हाला सोनी लिवचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. टीव्हीवर मॅच पाहात असाल तर तुम्हाला महिन्याला खर्च येतोच.

Loading...

कुठे पाहाल फुकटात?

अशावेळी फुकटात मॅच पाहायची असेल तर तुम्हाला डीडी स्पोर्ट्सवर जावं लागेल. डीडी फ्री डिश कनेक्शनने तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मॅचचा पूर्ण आनंद घेऊ शकता. ही मॅच फुकटात पाहू शकता. पण एक लक्षात ठेवा डीडी फ्री डिशचं कनेक्शन नसेल तर तुम्हाला मोफतमध्ये मॅच पाहता येणार नाही. हे कनेक्शन घेताना सुरुवातीला काही खर्च येतो. त्यानंतर तुम्ही पूर्णपणे फुकटात हे चॅनल पाहू शकता. पण तुम्हाला टीव्हीवरच याचा आनंद घेता येईल. मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबवर ही सुविधा नाहीये. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहता येईल, अशी घोषणाच दूरदर्शनने सोशल मीडियावरून केली आहे.

 

टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, गुरनूर बराड, नमन धीर, औकिब नबी, रुतुराज गायकवाड़, ईशान किशन

न्यूजीलंड संघ : हेनरी निकोल्स, विल यंग, ​​टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सेंटनर (कर्णदार), मॅट हेनरी, जॅकब डफी, नाथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेयर टिकनर, टिम सीफर्ट, काइल जॅमीसन.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us