AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Players List: रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर टीमची स्थिती काय? एका क्लिकवर सर्वकाही

IPL Retention 2026: आयपीएल फ्रेंचायझींनी भविष्याचा वेध घेत आणि पैशांचं गणित जुळवत खेळाडूंची रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. त्यामुळे रिलीज केलेल्या खेळाडूंवर मिनी लिलावात बोली लागणार यात काही शंका नाही. चला जाणून घेऊयात सर्व संघांची स्थिती काय ते...

IPL 2026 Players List: रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर टीमची स्थिती काय? एका क्लिकवर सर्वकाही
IPL 2026 Players List: रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर टीमची स्थिती काय? एका क्लिकवर सर्वकाहीImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Nov 15, 2025 | 7:13 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी अखेर जाहीर झाली आहे. प्रत्येक फ्रेंचायझीने भविष्याचा वेध घेत खेळाडूंना संघात ठेवलं आहे. तर काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. काही खेळाडूंची किंमत क्षमतेपेक्षा जास्त असल्याने कदाचित त्यांना रिलीज करून मिनी लिलावत पुन्हा घेतलं जाण्याची शक्यता आहे. पण आता हे सर्व मिनी लिलावातच स्पष्ट होईल. दुसरीकडे, अजूनही ट्रेड विंडोचा पर्यात असणार आहे. मिनी लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत खेळाडूंची ट्रेड विंडोच्या माध्यमातून देवाणघेवाण करता येणार आहे. असं असताना कोणत्या फ्रेंचायझींनी कोणत्या खेळाडूंना संघात ठेवलं याची संपूर्ण यादी जाणून घ्या.

फ्रेंचायझी आणि त्यांनी ट्रेड, रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

चेन्नई सुपर किंग्स : एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड़, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, खलील अहमद, मुकेश चौधरी, नाथन एलिस, अंशुल कंबोज, जेमी ओवर्टन, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, श्रेयस गोपाल. (संजू सॅमसन (ट्रे़ड))

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव, करुण नायर, समीर रिजवी, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, अजय मंडल, मुकेश कुमार, मिचेल स्टार्क, टी नटराजन, दुष्मंता चमीरा (नीतीश राणा (ट्रेड))

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु: विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जॉश हेझलवुड, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रोमारियो शेफर्ड, टिम डेविड, देवदत्त पडिक्कल, जैकब बॅथेल, स्वप्निल सिंह, रसिख सलाम, यश दयाल, नुवान तुषारा आणि अभिनंदन सिंह.

सनराइजर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिख क्लासन, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, रविचंद्रन स्मरण, कामिंडु मेंडिस, हर्ष दुबे, ब्रायडन कार्स, ईशान मलिंगा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झिशान अंसारी आणि अनिकेत वर्मा

गुजरात टायटन्स : शुबमन गिल, साई सुदर्शन, राशिद खान, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जॉस बटलर, निशांत सिंधु, वॉशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह बराड़, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव

कोलकाता नाइट रायडर्स: वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रोवमन पावेल, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक

लखनौ सुपर जायंट्स: ऋषभ पंत, मिचेल मार्श, एडन मार्करम, मयंक यादव, अब्दुल समद, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रीट्जकी, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह, (मोहम्मद शमी आणि अर्जुन तेंडुलकर (ट्रेड))

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिन्ज, मिचेल सैंटनर, नमन धीर, विल जैक्स, कॉर्बिन बॉश, राजअंगद बावा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर. (शार्दुल ठाकुर, शरफेन रदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे (ट्रेड))

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, नेहाल वढेरा, मुशीर खान, हरनूर सिंह, विष्णु विनोद, शशांक सिंह, पायला अविनाश, मार्कस स्टोइनिस, मार्को यानसन, अझतुल्लाह ओमरजाई, सूर्यांश शेडगे, मिचेल ओवन, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, झेव्हियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल आणि हरप्रीत बराड.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, वैभव सूर्यवंशी, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, युद्धवीर सिंह चरक, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, लुहान ड्रिप्रिटोरियस. (डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा आणि सॅम करन (ट्रेड))

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.