WPL 2024: TATA ने एलिस पेरीला का दिली तुटलेली काच भेट! कारण…

| Updated on: Mar 19, 2024 | 4:10 PM

ellyse perry : महिला प्रीमिअर लीगमध्ये एलिस पेरी हिने जबरदस्त कामगिरी केली आहे. तिने आपल्या खेळाने संघाला यंदाचं विजेतेपद मिळवून दिलंय. या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारी एलिस पेरी हिला टाटा कंपनीकडून चक्क एक तुटलेली काच देण्यात आली. कंपनीने का दिली पेरीला ही काच भेट जाणून घ्या.

WPL 2024: TATA ने एलिस पेरीला का दिली तुटलेली काच भेट! कारण...
Follow us on

Tata gift to perry : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने WPL 2024 चे विजेतेपद पटकावलं आहे. संघासाठी उत्तम कामगिरी करणारी स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी हिला टाटाकडून खास भेट देण्यात आली आहे. आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्यानंतर टाटा कंपनीकडून एलिस पेरी हिला तुटलेली काच भेट म्हणून देण्यात आली. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की टाटाने तिला अशी तुटलेली काच का भेट दिली असेल. काय आहे त्याचे कारण या बातमीतून आपण जाणून घेणार आहोत.

ही तीच काच आहे जी एलिस पेरी हिने तिच्या स्फोटक शॉटने फोडली होती. महिला प्रीमियर लीगच्या 11व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पेरीने दमदार षटकार मारून स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या कारची काच फोडली होती, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. स्मृती मानधनाच्या नेतृत्वीात आरसीबी संघाने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.


17 मार्च रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी झालेल्या फायनल सामन्यात देखील त्यांना विजय मिळवला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. आरसीबीने प्रथमच महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत धडक देत विजय देखील मिळवला आहे.

एलिस पेरीची स्फोटक कामगिरी

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात एलिस पेरीने धडाकेबाज कामगिरी केलीये. मुंबईच्या विरुद्ध तिने स्फोटक खेळी केली. आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आरसीबीकडून तिने 66 धावा केल्या आणि एक विकेट देखील घेतली. या दमदार कामगिरीसाठी तिला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला. सर्वाधिक 347 रन करत ती ऑरेंज कॅपची मानकरी देखील ठरली.

टाटाकडून खास भेट

मुंबईविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त शॉट मारत तिने कारची काच फोडली होती. त्यानंतर टाटाने तिला एक खास भेट दिली. टाटाच्या पंच ईव्ही कारची ही तुटलेली काच होती. या सामन्यात पेरीने 19 व्या ओव्हरमध्ये षटकार ठोकत कारची काच फोडली होती. काच फुटल्याने तिला देखील वाईट वाटले होते. हा सामना आरसीबी 23 धावांनी जिंकला होता.