WI vs IND 2nd T20i | टीम इंडियाने टॉस जिंकला, प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल

West Indies vs India 2nd T20I | वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे.

WI vs IND 2nd T20i | टीम इंडियाने टॉस जिंकला, प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल
| Updated on: Aug 06, 2023 | 8:27 PM

गयाना | वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. स्टार बॉलर दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

दुसऱ्या सामन्यातून अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. बीसीसीआयने ट्विट करत कुलदीप यादव याला दुखापत झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे कुलदीप यादव याच्या जागी रवि बिश्नोई याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कुलदीप यादव याला काय झालं?

कुलदीप यादव याला नेटमध्ये बॅटिंग करताना सरावादरम्यान दुखापत झाली. कुलदीपच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला बॉलचा फटका बसला. कुलदीपला यामुळे दुखापत झाली. त्यामुळे कुलदीप निवडीसाठी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रवि बिश्नोई याला संधी मिळाली.

मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न

वेस्ट इंडिजने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. विंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र दुसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंना योगदान द्यावं लागणार आहे. त्यामुळे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा हार्दिक पंड्या याने घेतलेला निर्णय टीम इंडियाचे फलंदाज चूक ठरवतात की बरोबर, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

एका बदलासह टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन


टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.