VIDEO: बॅट्समनने शॉट मारला, 4 किंवा 6 जाणार असं वाटलं, पण….विश्वास नाही बसणार एकदा व्हिडिओ बघा

| Updated on: Jan 18, 2023 | 10:22 AM

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा थक्क करुन सोडणाऱ्या गोष्टी घडतात. पाहणाऱ्यांना अनेकदा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पण असे किस्से मैदानात घडतात. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये अशीच एक कॅच पहायला मिळाली.

VIDEO: बॅट्समनने शॉट मारला, 4 किंवा 6 जाणार असं वाटलं, पण....विश्वास नाही बसणार एकदा व्हिडिओ बघा
SA T20 League
Image Credit source: VideoGrab
Follow us on

डरबन: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा थक्क करुन सोडणाऱ्या गोष्टी घडतात. पाहणाऱ्यांना अनेकदा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पण असे किस्से मैदानात घडतात. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये अशीच एक कॅच पहायला मिळाली. या कॅचच उदहारण भविष्यात दिलं जाईल. तुम्ही सुद्धा ही कॅच पाहिल्यानंतर अवाक व्हाल. तुम्हाला प्रश्न पडेल, हे कसं घडलं? बॅट्समनने शॉट मारल्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षक, प्लेयर्स आणि अंपायर यांना हा चेंडू सिक्स किंवा फोर जाणार असं वाटलं. पण कथेत अचानक टि्वस्ट आला. बाऊंड्री लाइनवर फिल्डिंग करणाऱ्या एका प्लेयरने सर्वांचेच अंदाज चुकवले.

खरोखरच ही गजब कॅच

हे सुद्धा वाचा

ज्या चेंडूवर फोर किंवा सिक्स जाणार असं वाटत होतं. अचानक तो चेंडू फिल्डरने कॅचमध्ये बदलला. याच सगळ श्रेय त्या फिल्डरच आहे. बॅट्समन 6 किंवा 4 च्या प्रतिक्षेत होता. पण त्याला खिन्न मनाने पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. या कॅचबद्दल आम्ही इतकं का बोलतोय असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. पण खरोखरच ही गजब कॅच आहे.

ही मोठी कॅच

ज्याने कोणी ही कॅच पाहिली, ते थक्क झाले. आश्चर्याचे भाव तुमच्याही चेहऱ्यावर उमटतील. SA20 लीग जोहान्सबर्ग सुपर किंग्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्सच्या सामन्यात हे दृश्य पहायला मिळालं.


फोर कि, सिक्स? मध्येच काय घडलं?

या T20 मॅचमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्सच्या इनिंगची शेवटची ओव्हर सुरु होती. गेराल्ड कॉट्जे स्ट्राइकवर होता. प्रिटोरिया कॅपिटल्सचा इशन बॉश्च बॉलिंग करत होता. चौथ्या चेंडूवर कॉट्जेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो त्यात यशस्वी सुद्धा ठरला. चेंडू हवेत गेला. चेंडू बाऊंड्री लाइन पार करणार होता, पण प्रिटोरियाचा फिल्डर विल जॅक्सने धावत येऊन एकाहाताने अद्भूत कॅच पकडली.

स्टीफन फ्लेमिंगच्या चेहऱ्यावर हास्य

ही खूप कठीण कॅच होती. पण विल जॅक्सने सहज हा झेल घेतला. ही कॅच इतकी सोपी होती का? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येतो. ही कमालीची कॅच पाहिल्यानंतर जोहान्सबर्ग सुपर किंग्सचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांच्या चेहऱ्यावरही हास्य होते.