AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : रविवारी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोण करणार विजयी सुरुवात?

India Women vs Australia Women 1st ODI Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

IND vs AUS : रविवारी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोण करणार विजयी सुरुवात?
BcciImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 14, 2025 | 1:00 AM
Share

क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लागून आहे. हा सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसर्‍या बाजूला रविवारी टीम इंडियाचा आणखी एक सामना होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. मात्र हा सामना मेन्सचा नसून वूमन्स टीमचा असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स यांच्यात एकूण 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय मालिका असणार आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर एलिसा हीली हीच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. उभयसंघात होणाऱ्या पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅचचा थरार मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे अनुभवता येईल.

वनडे वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची ही आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेआधीची शेवटची मालिका आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन फॉर्मेटने होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या स्पर्धेत प्रत्येक संघाला इतर सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळायचा आहे. त्यानुसार रविवारी 12 ऑक्टोबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्याआधी दोन्ही संघांना एकदिवसीय मालिकेतून एकमेकांची चांगली-कमी बाजू जाणून घेण्याची संधी असणार आहे.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर