
वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेपाळ आमनेसामने असणार आहेत. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर इंदू बर्मा हीच्याकडे नेपाळच्या नेतृत्वाची सूत्रं आहेत. टीम इंडिया आणि नेपाळचा हा तिसरा सामना आहे. टीम इंडियाने याआधीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान आणि नेपाळने खेळलेल्या 2 पैकी 1 सामना गमावलाय आणि 1 सामना जिंकलाय. त्यामुळ नेपाळसाठी टीम इंडिया विरुद्धचा सामना अटीतटीचा असा असणार आहे. तसेच या सामन्याच्या निकालाकडे पाकिस्तानचं लक्ष असणार आहे. नेपाळने हा सामना गमावल्यास पाकिस्तान नेट रनरेटच्या जोरावर पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे इंडिया-नेपाळ हा सामना निर्णायक असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना मंगळवारी 23 जुलै रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
इंडिया-नेपाळ आमनेसामने
𝗔𝗿𝗲 𝘆𝗼𝘂 𝗿𝗲𝗮𝗱𝘆 𝗳𝗼𝗿 𝗶𝘁? 🇳🇵🇮🇳
Nepal takes against @BCCIWomen tomorrow. #AsiaCupW | #WomensCricket | #NepalCricket | #HerGameToo pic.twitter.com/60TVvReDNO
— CAN (@CricketNep) July 22, 2024
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), रिचा घोष (विकेटकीपर), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, तनुजा कंवर, अरुंधती रेड्डी, एस सजना, उमा चेत्री आणि ए शोभना.
वूमन्स नेपाळ टीम: इंदू बर्मा (कॅप्टन), काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), समझ खडका, सीता राणा मगर, कविता कुंवर, रुबिना छेत्री, रोमा थापा, पूजा महतो, बिंदू रावल, कविता जोशी, कृतिका मरासिनी, राजमती आयरी, ममता चौधरी, डॉली भट्ट आणि सबनम राय.