
टीम इंडियाने वूमन्स आशिया कप स्पर्धेत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाने स्पर्धेतील 10 व्या सामन्यात शेजारी नेपाळवर 82 धावांनी मात करत तिसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. टीम इंडियाने नेपाळला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर नेपाळला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 96 धावांपर्यंतच मजल मारता आली. नेपाळचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात आलं आहे. तर टीम इंडिया पुढी फेरीसाठी पात्र ठरली आहे.
नेपाळकडून फक्त 4 जणांनाच 10 पेक्षा अधिक धावा करता आल्या. तर त्या व्यतिरिक्त इतरांना त्यापुढे जाताच आलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी नेपाळला ठराविक अंतराने झटके देत एकालाही मोठी खेळी करुन दिली नाही. टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राधा यादव आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रेणुका ठाकुरने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. टीम इंडियासाठी शफाली वर्मा आणि हेमलथा या सलामी जोडीने 122 धावांची भागीदारी केली. हेमलथाने 42 बॉलमध्ये 47 रन्स केल्या. तर शफालीने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. तर एस सजनाने 10 आणि जेमिमाह रॉड्रिग्सने 6 धावा केल्या सजना आणि जेमिमाह दोघी नाबाद परतल्या. नेपाळकडून सीता मगर हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर कबिता जोशीने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये
𝙄𝙣𝙩𝙤 𝙩𝙝𝙚 𝙎𝙚𝙢𝙞𝙨!#TeamIndia continue their winning run in #WomensAsiaCup2024 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/PeRykFLdTV#ACC | #INDvNEP pic.twitter.com/8Eg77qAJOt
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
नेपाळ वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: इंदू बर्मा (कॅप्टन), समझ खड्का, सीता राणा मगर, कविता कुंवर, डॉली भट्टा, रुबिना छेत्री, पूजा महतो, कविता जोशी, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), सबनम राय आणि बिंदू रावल.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, एस सजना, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग आणि अरुंधती रेड्डी.