
वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेपाळ आमनेसामने आहेत. टीम इंडियाने नेपाळसमोर विजयासाठी 179 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 178 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियाच्या सलामी जोडीने शानदार बॅटिंग केली. शफाली वर्मा हीने विस्फोटक फलंदाजी केली. तसेच दयालन हेमलथाने तिला चांगली साथ दिली. तर अखेरीस जेमिमाह रॉड्रिग्सने 28 धावांची निर्णायक खेळी साकारली.
टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची जोरदार सुरुवात झाली. शफाली वर्मा आणि दयालन हेमलथा या जोडीने 122 धावांची सलामी भागादीरी केली. या दरम्यान दोघींनी चौफेर फटकेबाजी केली. शफालीने अवघ्या 26 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूने हेमलथाही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. मात्र ती दुर्देवी ठरली. हेमलथा 47 धावांवर बाद झाली. हेमलथाने 42 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. हेमलथानंतर शफालीही आऊट झाली. शफालीच्या 81 धावांच्या खेळीत 1 सिक्स आणि 12 चौकारांचा समावेश होता. ही सेट जोडी माघारी परतल्यानंतर एस संजना हीने 10 धावा केल्या. तर जेमीमाह आणि रिचा ही जोडी नाबाद परतली. जेमीमाहने 15 बॉलमध्ये 5 फोर ठोकत नॉट आऊट 28 रन्स केल्या. तर रिचाने नाबाद 6 धावा केल्या. नेपाळकडून सीता मगरने 2 आणि कबिता जोशीने 1 विकेट घेतली.
दरम्यान शफालीने 81 धावांच्या खेळीदरम्यान एक खास कारनामा केला. शफालीने वयाच्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
नेपाळला 179 धावांचं आव्हान
Innings Break!#TeamIndia set a 🎯 of 179 runs
8⃣1⃣ from @TheShafaliVerma 💪
4⃣7⃣ from Dayalan Hemalatha 👌Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/PeRykFLdTV#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvNEP pic.twitter.com/wSVFwk55AX
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
नेपाळ वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: इंदू बर्मा (कॅप्टन), समझ खड्का, सीता राणा मगर, कविता कुंवर, डॉली भट्टा, रुबिना छेत्री, पूजा महतो, कविता जोशी, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), सबनम राय आणि बिंदू रावल.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, एस सजना, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग आणि अरुंधती रेड्डी.