WIND vs WPAK Live Streaming: इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, सामना कुठे पाहता येणार?

Womens Asia Cup IND vs PAK Live Streaming: वूमन्स आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत.

WIND vs WPAK Live Streaming: इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, सामना कुठे पाहता येणार?
wind vs wpak cricket
| Updated on: Jul 18, 2024 | 7:18 PM

वूमन्स आशिया कप स्पर्धेला 19 जुलैपासून सुरुवात आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. या स्पर्धेत 2 कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. हरमनप्रीत कौर भारतीय संघांचं नेतृत्व करणार आहे. निदा डार पाकिस्तानची सूत्र सांभाळणार आहे. या महामुकाबल्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना केव्हा?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान यांच्यातील सामना हा शुक्रवारी 19 जुलै रोजी होणार आहे.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना कुठे?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना रांगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला येथे होणार आहे.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्ल्स हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

आशिया कप 2024 स्पर्धेसाठी वूमन्स टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजाना संजीवन.

वूमन्स पाकिस्तान क्रिकेट टीम: निदा डार (कॅप्टन), आलिया रियाज, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नजीहा अल्वी, नाशरा संधू, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन.