IND vs UAE Live Streaming: टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, यूएईचं आव्हान, सामना कुठे?

India Women vs United Arab Emirates Women Live Streaming: यूएईला सलामीच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे यूएईसाठी टीम इंडिया विरुद्धचा सामना हा करो या मरो असा आहे.

IND vs UAE Live Streaming: टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, यूएईचं आव्हान, सामना कुठे?
wind vs wuae asia cup 2024
| Updated on: Jul 20, 2024 | 11:21 PM

वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध यूनायटेड अरब अमिराती संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत विजयी सलामी दिली. तर यूएईला नेपाळकडून पराभूत व्हावं लागलं. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 3 सामने खेळणार आहे. त्यामुळे आता यूएईला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत टीम इंडिया विरुद्धचा सामना जिंकवा लागणार आहे. ईशा रोहित ओझा ही यूएईचं नेतृत्व करणार आहे. तर हरमनप्रीत कौर हीच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याबाबत सर्वकाही जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना रविवारी 21 जुलै रोजी होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याचं आयोजन हे रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं आहे.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना मोबाईलवर मोफत कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

वूमन्स टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधना, दयालन हेमलथा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयांका पाटील, रेणुका ठाकुर सिंग, उमा चेत्री, सजना, अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना.

संयुक्त अरब अमिराती वूमन्स टीम: ईशा रोहित ओझा (कॅप्टन), तीर्था सतीश (विकेटकीपर), रिनिता राजित, समायरा धरणीधारका, कविशा इगोडागे, खुशी शर्मा, हीना होचंदानी, वैष्णवे महेश, रितीका राजित, लावण्य केनी, इंधुजा नंदकुमार, मेहमी ठाकूर, इमेली थॉमस, ऋषिथा राजित आणि सुरक्षा कोट्टे.