IND vs SA : जूनमध्ये टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार मालिका, जाणून घ्या वेळापत्रक

INDW vs SAW : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका होणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

IND vs SA :  जूनमध्ये टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार मालिका, जाणून घ्या वेळापत्रक
ind vs sa,
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 8:50 PM

क्रिकेट विश्वात सध्या आयपीएलच्या 17 व्या हंगामासह आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची चर्चा सुरु आहे. आयपीएल स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कपसाठी प्रत्येक सहभागी देशाने आपला संघ जाहीर केला आहे. अशात क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहेत. या मालिकांचं वेळापत्रक समोर आलं आहे.

वूमन्स क्रिकेट टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. वूमन्स टीमसाठी आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे वर्ल्ड कपची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. अशात टीम इंडिया वूमन्स-दक्षिण आफ्रिका वूमन्स मालिकेचं संभाव्य वेळापत्रक समोर आलंय. वूमन्स साऊथ अफ्रिका टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यात 1 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघ अर्थात केएससीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वनडे आणि टी 20 सामन्यांचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात येणार आहे. तर एकमेव कसोटी सामना हा चेन्नई खेळवण्यात येऊ शकतो. वनडे सीरिजला 16 जूनपासून सुरुवात होईल. तर एकमेव कसोटी सामना 28 जून रोजी होईल. त्यानंतर 5, 7 आणि 9 जुलै रोजी टी 20 मालिका पार पडेल. ही मालिकाही बंगळुरुत पार पडेल.

दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार!

दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या 5 सामन्यांची टी 20 मालिका टीम इंडियाने जिंकली आहे. टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना हा सोमवारी 6 मे रोजी होणार आहे.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.