AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS, WWC 2022: मिताली-यास्तिकाची रेकॉर्डब्रेक भागीदारी, हरमनप्रीत-वस्त्राकरची फटकेबाजी, भारताचा ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर

आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत (2022 Women's Cricket World Cup) आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना सुरु आहे. ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.

IND vs AUS, WWC 2022: मिताली-यास्तिकाची रेकॉर्डब्रेक भागीदारी, हरमनप्रीत-वस्त्राकरची फटकेबाजी, भारताचा ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर
Mithali Raj, Yastika Bhatia Image Credit source: Twitter
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 19, 2022 | 10:34 AM
Share

मुंबई :यसीसी महिला वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत (2022 Women’s Cricket World Cup) आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना सुरु आहे. ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियाची जलदगती गोलंदाज डर्सी ब्राउनने हा निर्णय योग्य ठरवला. तिने चौथ्या षटकात स्मृती मानधनाला (10) आणि सहाव्या षटकात शेफाली वर्माला (12) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय संघ अडचणीत असताना मिताली राज (Mithali Raj) आणि यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) डाव सावरला. दोघींमध्ये शतकी भागीदारी झाली. मिताली आणि यस्तिका या दोघींनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. यादरम्यान, दोघींनी भारताकडून तिसर्‍या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचण्याचा रेकॉर्ड केला.

आधी मिताली राजने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर यास्तिका भाटियानेही अर्धशतक झळकावले. यास्तिका 59 धावांवर बाद झाली, जे तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचं तसेच या महिला विश्वचषकातील पहिले अर्धशतक होते.

154 चेंडूत 130 धावांची भागीदारी

यास्तिका भाटिया आणि मिताली राज यांनी या सामन्यात 154 चेंडूत 130 धावांची भागीदारी केली. भारतासाठी तिसऱ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. ही भागीदारी अशा वेळी रचली जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यास्तिका आणि मिताली या दोघांनीही या विश्वचषकात यापूर्वी काही खास कामगिरी केली नव्हती. पण, निर्णायक सामन्यात संघाला संकटातून बाहेर काढण्याची वेळ आली, तेव्हा अनुभव आणि उत्साहाने सुसज्ज असलेली ही जोडी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी ठरली.

मिताली राजची 68 धावांची खेळी

मिताली राजने 96 चेंडूत 68 धावा केल्या, जे तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 63 वे अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या 5 डावातील ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 21 सप्टेंबर 2021 रोजी मकाय येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात तिने 63 धावा केल्या होत्या. सध्याच्या विश्वचषकात मिताली राजचे हे पहिले अर्धशतक आहे. या अर्धशतकासह मिताली महिला विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारी फलंदाज ठरली आहे.

हरमनप्रीत-वस्त्राकरची फटकेबाजी

या विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतने तिचा फॉर्म कायम ठेवला आहे. तिने आक्रमक फटकेबाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. तसेच ती नाबाद परतली. तिने पूजा वस्त्राकरसोबत 7 व्या विकेटसाठी 47 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. दोघींनी अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. हरमनने 47 चेंडूत 6 चौकारांसह 57 धावा फटकावल्या तर पूजाने 28 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह 34 धावा फटकावल्या.

इतर बातम्या

CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल

Delhi Capitals IPL 2022: Unsold ठरलेल्या पुण्याच्या कौशल तांबेला पाँटिंग, आगरकरांसमोर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी

KXIP IPL 2022: ‘त्यांनी न्याय केला नाही’, किंग्स इलेव्हन पंजाबबद्दल सुनील गावस्करांचं महत्त्वाचं विधान

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली