5

Delhi Capitals IPL 2022: Unsold ठरलेल्या पुण्याच्या कौशल तांबेला पाँटिंग, आगरकरांसमोर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी

Delhi Capitals IPL 2022: आयपीएल मेगा ऑक्शनआधी (IPL Mega Auction) अंडर 19 टीमने (Under 19 Team) वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप जिंकला.

Delhi Capitals IPL 2022: Unsold ठरलेल्या पुण्याच्या कौशल तांबेला पाँटिंग, आगरकरांसमोर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी
पुण्याचा ऑफ स्पिनर कौशल तांबेImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 7:40 PM

मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनआधी (IPL Mega Auction) अंडर 19 टीमने (Under 19 Team) वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप जिंकला. आपल्या कामगिरीने या संघातील युवा खेळाडूंनी सर्वच फ्रेंचायजींच आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं. अंडर 19 संघातील काही खेळाडूंना आयपीएल फ्रेंचायजींनी करारबद्धही केलं. राज बावाला (Raj bawa) पंजाब किंग्सने तर उस्मानाबादच्या राज्यवर्धन हंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ताफ्यात घेतलं. दिल्ली कॅपिटल्सने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यात जास्त रस दाखवला. यश धुल आणि विकी ओस्टवाल या खेळाडूंना दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं. आयपीएल 2022 स्पर्धेला सुरुवात व्हायला आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्याआधी ऋषभ पंतने आपल्या दिल्लीच्या संघात आणखी एका प्रतिभावान युवा खेळाडूला संधी दिली आहे.

ऑक्शनमध्ये अनसोल्ड

पुण्याचा कौशल तांबे या सीजनमध्ये नेट बॉलर म्हणून दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला आहे. त्याला ऑक्शनमध्ये दिल्लीने विकत घेतलेलं नाही. त्यामुळे संघाचा तो अधिकृत सदस्य नाही. वर्ल्ड कपमध्ये ऑफ स्पिनर कौशल तांबेने चांगली कामगिरी केली. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने लक्ष वेधून घेतलं. मेगा ऑक्शनमध्ये कौशलची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. पण तो अनसोल्ड ठरला. कुठल्याही फ्रेंचायजीने त्यावर बोली लावली नाही.

वडिल सहाय्यक पोलीस आयुक्त

कौशल तांबेकडे आता दिल्ली कॅपिटल्सच्या हाय-प्रोफाइल कोचेस समोर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी आहे. रिकी पाँटिंग दिल्लीचे मुख्य कोच आहेत. प्रवीण आमरे, अजित आगरकर आणि शेन वॅटसन दिल्लीच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. त्यांच्याकडून पुण्याच्या या युवा खेळाडूला बरच काही शिकता येईल. कौशल तांबेचे वडिल महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्याची आई वकील आहे. वडिल सुनील तांबे यांना क्रिकेटची आवड असल्यामुळे कौशल क्रिकेटच्या क्षेत्रात आला. “विद्यापीठ स्तरीय आणि मुंबईत कांगा लीग क्रिकेट स्पर्धा मी खेळलो आहे. पण मी क्रिकेटमध्ये करीयर करु शकलो नाही. माझा मुलगा क्रिकेटमध्ये काही तरी करेल अशी मला अपेक्षा आहे आणि तो करतो सुद्धा आहे” असे सुनील तांबे म्हणाले.

मूळचा जुन्नरचा आहे कौशल तांबे कौशल मूळचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून कौशलची भारतीय संघात निवड झाली. त्याने सुद्धा गरजेनुसार फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कौशलने 35 धावा केल्या. त्यानंतर ऑफब्रेक गोलंदाजी करणाऱ्या कौशलने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दोन विकेट घेतल्या, तर फायनलपर्यंतच्या सामन्यांमध्ये एक-दोन विकेट घेऊन योगदान दिलं.

चॅलेंजर ट्रॉफी आणि विनू मंकड स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली. सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विनू मंकड करंडक स्पर्धेत तांबेने 54.67 च्या सरासरीने 328 धावा केल्या. चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत त्याने 67 च्या सरासरीने 134 धावा केल्या. कौशल तांबे महाराष्ट्राच्या पश्चिम विभागासाठी खेळतो. कौशलचे वडिल एसीपी असून ते पोलीस दलात आहेत. त्यामुळे घरात एक प्रकारची शिस्त आहे. शाळेत असल्यापासून तो क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण सुरु केलं. क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम आहे.

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?