AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup Final…आणि पुणेकर कौशलने सुटलेली कॅच पुन्हा घेतली, पाहा ‘त्या’ अप्रतिम झेलचा VIDEO

पण जेम्स रियू आणि जेम्स सेल्सच्या जोडीने या दोघांसह भारतीय गोलंदाजांना चांगलचं सतावलं. या दोघांची जमलेली जोडी फोडणं आवश्यक होतं. अन्यथा इंग्लंड चांगली धावसंख्या उभारु शकला असता.

U19 World Cup Final...आणि पुणेकर कौशलने सुटलेली कॅच पुन्हा घेतली, पाहा 'त्या' अप्रतिम झेलचा VIDEO
kaushal tambe
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 9:57 PM
Share

गयाना: अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंडमध्ये (India vs England) अंडर 19 वर्ल्डकपचा अंतिम (ICC Under 19 world cup final) सामना सुरु आहे. पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्याने भारताचा युवा संघ मैदानात उतरला आहे. इंग्लंडचा संघ दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये खेळतोय. यापूर्वी 1998 साली इंग्लंडने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला आहे. आज सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या रवी कुमार, (Ravi kumar) राज बावाने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यांनी सुरुवातीपासून इंग्लंडला धक्के दिले. पण जेम्स रियू आणि जेम्स सेल्सच्या जोडीने या दोघांसह भारतीय गोलंदाजांना चांगलचं सतावलं. या दोघांची जमलेली जोडी फोडणं आवश्यक होतं. अन्यथा इंग्लंड चांगली धावसंख्या उभारु शकला असता.

रवी कुमार संघाच्या मदतीला धावून आला

अशावेळी डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार संघाच्या मदतीला धावून आला. त्याच्या गोलंदाजीवर जेम्स रियूने पुलचा फटका खेळला. त्यावेळी सीमारेषेवर उभ्या असलेल्या कौशल तांबेकडे झेल गेला. हा झेल घेण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या हातातून निसटला. पण कौशलने पुढे सूर मारुन अप्रतिम असा हा झेल घेतलाच. त्याच्या या कॅचचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. या झेलमुळे रियूच शतक हुकलं. त्याने झुंजार खेळ केला.

रियू आणि सेल्सची जोडी फोडली नसती, तर इंग्लंडची धावसंख्या 240-250 पर्यत पोहोचू शकली असती. रियू बाद झाल्यानंतर अवघ्या पाच धावात इंग्लंडचे दोन फलंदाज बाद झाले आणि इंग्लंडचा डाव 189 धावांवर आटोपला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

कौशल तांबेची बॅट आणि बॉलने कमाल 

कौशल तांबेने या वर्ल्डकपमध्ये चेंडू आणि बॅटने महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. चार डावांमध्ये तांबेने 86 धावा करतानाच सहा विकेटही घेतल्या आहेत. मूळचा पुण्याचा असलेला कौशल ऑफस्पिन गोलंदाजीही करतो. कौशल तांबेची आयपीएल मेगा ऑक्शनसाठी निवड झाली असून त्याची बेस प्राइस 20 लाख रुपये आहे. आजच्या सामन्यात कौशल तांबेने पाच षटकात 29 धावा देत एक विकेट घेतला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.