AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल

CSK IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेला 26 मार्च रोजी सुरुवात होत आहे. दोन नव्या फ्रेंचायजींमुळे एकूण 10 टीम्स झाल्या आहेत. एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत.

CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील 'या' आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल
IPL 2022 - एमएस धोनी Image Credit source: File photo
| Updated on: Mar 18, 2022 | 8:44 PM
Share

नवी दिल्ली – बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेला 26 मार्च रोजी सुरुवात होत आहे. दोन नव्या फ्रेंचायजींमुळे एकूण 10 टीम्स झाल्या आहेत. एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. यंदा महेंद्रसिंह धोनी (MS dhoni) आपल्या चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा किताब जिंकवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन चेन्नई (CSK) यंदाही विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. धोनी असताना हे शक्य आहे. कारण आकडेच याबद्दल सर्वकाही सांगून जातात. आयपीएलच्या इतिहासात अजूनपर्यंत धोनीपेक्षा उत्तम फिनिशर दुसरा कोणीही झालेला नाही. शेवटच्या पाच षटकात धावा बनवण्याची गरज असेल आणि धोनी क्रीझवर असेल, तर गोलंदाजांची धुलाई ठरलेली आहे. रेकॉडर्सवर नजर मारली, तर शेवटच्या पाच षटकात सर्वाधिक धावा बनवण्यामध्ये धोनी नंबर 1 आहे.

धोनीने 15 व्या षटकात आतापर्यंत सर्वाधिक 442 धावा केल्या आहेत. 16 व्या षटकात धावांची गती अधिक वेगवान होते. या षटकात धोनीने सर्वाधिक 476 धावा केल्या आहेत. शेवटच्या पाच षटकात कुठल्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्यात, जाणून घेऊया.

16 व्या षटकात सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज महेंद्र सिंह धोनी – 476 रन एबी डिविलियर्स – 447 रन रोहित शर्मा       – 336 रन कायरन पोलार्ड  – 314 रन युवराज सिंह    – 305 रन

17 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज महेंद्र सिंह धोनी – 572 रन कायरन पोलार्ड  – 445 रन एबी डिविलियर्स – 386 रन रोहित शर्मा       – 362 रन दिनेश कार्तिक  – 360 रन

18 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज महेंद्र सिंह धोनी – 596 रन कायरन पोलार्ड  – 433 रन एबी डिविलियर्स – 406 रन रोहित शर्मा       – 293 रन विराट कोहली   – 276 रन

19 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज महेंद्र सिंह धोनी – 599 रन एबी डिविलियर्स – 404 रन कायरन पोलार्ड  – 362 रन रवींद्र जडेजा    – 305 रन हार्दिक पंड्या   – 273 रन

20 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज महेंद्र सिंह धोनी – 610 रन कायरन पोलार्ड  – 378 रन रवींद्र जडेजा    – 276 रन रोहित शर्मा     – 248 रन हार्दिक पंड्या   – 233 रन

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.