AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला वर्ल्डकप 2025 विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी, बक्षिसाच्या रकमेत 297 टक्क्यांनी वाढ

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही तासात सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे. 30 सप्टेंबरला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यंदा भारतीय महिला संघाकडून क्रीडाप्रेमीना फार अपेक्षा आहेत.

महिला वर्ल्डकप 2025 विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी, बक्षिसाच्या रकमेत 297 टक्क्यांनी वाढ
महिला वर्ल्डकप 2025 विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी, बक्षिसाच्या रकमेत 297 टक्क्यांनी वाढImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 29, 2025 | 9:01 PM
Share

महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघ गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा दबदबा होता. पण भारतीय महिला संघ आता कुठेच कमी नाही. यंदा भारतीय संघ वनडे वर्ल्डकप विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होत असल्याने होम अॅडव्हान्टेज असणार आहे. त्यात भारतीय संघ फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 2-1 गमावली असली तरी भारतीय क्रिकेटपटूंनी चांगली खेळी केली. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिलाच सामना श्रीलंकेशी होत आहे. या सामन्यात विजयी मिळवून स्पर्धेला सुरुवात करेल, अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. दरम्यान, यंदाचा महिला वनडे वर्ल्डकप वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे बक्षिसाची रक्कम…आयसीसीने बक्षिसाच्या रक्कमेत 297 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे विजेत्या संघाला मोठी रक्कम मिळणार आहे.

महिला वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला जवळपास 40 कोटींची रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला त्याच्या निम्मी म्हणजेच जवळपास 20 कोटी मिळणार आहेत. उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघाला जवळपास 10 कोटी रुपये मिळतील. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 6 कोटी मिळतील. तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघाला अडीच कोटी रुपये मिळतील. दुसरीकडे, या स्पर्धेत भाग घेतलेला संघ जिंको किंवा हरो त्या संघाला कमीत कमी 2 कोटी 50 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आयसीसीने बक्षिसाची रक्कम वाढवल्याने स्पर्धेची रंगत वाढली. बक्षिसाची रक्कम दोन वर्षांपूर्वी भारतात झालेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकापेक्षा जास्त आहे. महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी आयसीसीने पाऊल उचललं आहे.

आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे सामने

  • 30 सप्टेंबर, मंगलवार: भारत vs श्रीलंका
  • 5 ऑक्टोबर, रविवार: भारत vs पाकिस्तान
  • 9 ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs दक्षिण अफ्रीका
  • 12 ऑक्टोबर, रविवार: भारत vs ऑस्ट्रेलिया
  • 19 ऑक्टोबर, रविवार: भारत vs इंग्लैंड
  • 23 ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs न्यूजीलैंड
  • 26 ऑक्टोबर, रविवार: भारत vs बांग्लादेश

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.