World Cup : शिखर धवन याने पाकिस्तानच्या फिल्डिंगची घेतली फिरकी, शेअर केला मजेशीर Video

Pak vs Aus Warm Up Match : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी एक सराव सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं पुन्हा एकदा दर्शन झालं. हा मजेशीर व्हिडीओ शिखर धवन याने शेअर केला आहे.

World Cup : शिखर धवन याने पाकिस्तानच्या फिल्डिंगची घेतली फिरकी, शेअर केला मजेशीर Video
World Cup : वॉर्मअप सामन्यात पाकिस्तानची फिल्डिंग पुन्हा एकदा फजिती, शिखर धवनने शेअर केला व्हिडीओ
Image Credit source: Screengrab
| Updated on: Oct 03, 2023 | 11:25 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाला एक प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र सराव सामन्यातील कामगिरी पाहून आता क्रीडाप्रेमींचं मत नक्कीच बदललं असेल. सराव सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रवास पाकिस्तानसाठी सोपा नसेल हे देखील तितकंच खरं आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 351 धावा केल्या आणि विजयासाठी 352 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 47.4 षटकात सर्वबाद 337 धावा करू शकला. पाकिस्तानचा 14 धावांनी पराभव झाला. असं असलं तरी या सामन्यात पाकिस्तानचं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 23 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद वसीम आणि मोहम्मद नवाज चाचपडताना दिसले.

हॅरिस रउफने मार्नस लाबुशेन याला शॉर्ट लेंथ चेंडू टाकला. त्याने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फटकावला. तेव्हा हा चेंडू अडवण्यासाठी मोहम्मद वसीम आणि मोहम्मद नवाज यांनी प्रयत्न कला. पण चेंडू अडवण्यात अपयश आलं. एकमेकांना ठोकता ठोकता वाचले. यामुळे चेंडू सीमेजवळ गेला आणि दोघंही पुन्हा धावले. हा व्हिडीओ आता शिखर धवनने शेअर केला आहे.

“पाकिस्तान आणि फिल्डिंग कधीही न संपणारी प्रेम कहाणी”, असं ट्वीट त्याने केलं आहे. सध्या शिखर धवन आराम करत आहे. एशियन गेम्स संघातही त्याची निवड झालेली नाही. वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँडशी होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना भारताशी 8 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 20 ऑक्टोबरला लढत होणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

पाकिस्तान संघ: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम , मोहम्मद रिझवान, सौद शकील, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, फखर जमान, मोहम्मद नवाज, शादाब खान (कर्णधार), उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी , हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर

ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट , ट्रॅव्हिस हेड, अॅडम झाम्पा