WTC Final 2025 : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पराभवासाठी या खेळाडूला धरलं जबाबदार, म्हणाला…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जेतेपद दुसऱ्यांदा मिळवण्याचं ऑस्ट्रेलिायचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 282 धावा दिल्या तेव्हा हा सामना त्यांच्या पारड्यातच होता. पण तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात सगळं चित्र बदललं आणि दक्षिण अफ्रिकेने सामन्यावर पकड मिळवली. हा सामना कुठे गमावला याचं विश्लेषण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने सामन्यानंतर केलं.

WTC Final 2025 : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पराभवासाठी या खेळाडूला धरलं जबाबदार, म्हणाला...
पॅट कमिन्स
Image Credit source: video grab/Twitter
| Updated on: Jun 14, 2025 | 6:07 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. 27 वर्षानंतर आयसीसी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण केलं. 1998 ते 2025 या मधल्या काळात दक्षिण अफ्रिकेला जेतेपदाची संधी चालून आली होती. पण वारंवार पदरी निराशा पडत होती. त्यामुळे चोकर्सचा डाग माथ्यावर बसला होता. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आणि सर्व डाग पुसून काढले. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं होतं. खरं तर लॉर्ड्सवर दुसऱ्या डावात इतकी मोठ्या धावांचा पाठलाग करणं काही सोपं काम नव्हतं. पण दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी तग धरला आणि जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांची खेळी महत्त्वाची ठरली. या दोघांनी मोक्याच्या क्षणी मोठी भागीदारी केली. तसेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचं कारण सांगताना पॅट कमिन्सने खेळपट्टीचा उल्लेख केला. तसेच लियानच्या फिरकीची जादू चालली नाही त्याचा फटका बसल्याचं सांगितलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ‘गोष्टी खूप लवकर बदलू शकतात पण दुर्दैवाने हे खूप दूरचे होते. नेहमीच काही गोष्टी असतात, पहिल्या डावात चांगली आघाडी होती आणि त्यांना बाद करण्याचा प्रयत्न केला होता. पण घडले नाही. खरं तर इथपर्यंतच्या प्रवासाची दोन वर्षे खूप छान गेली. पण या सामन्यासाठी तसं काही घडलं नाही. विकेट सपाट झाल्यासारखे दिसत होते पण इथे ते बदलू शकते, दुर्दैवाने ते घडले नाही. लियोनो चांगली गोलंदाजी करत होता पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.’

पॅट कमिन्सने या विजयाचं श्रेय एडन मार्करला दिलं. त्याच्या शतकी खेळीमुळे दक्षिण अफ्रिकेचा विजय सोपा झाला. ‘एडन शानदार होता. दक्षिण आफ्रिका पात्र विजेता होता, त्याने स्वतःला खेळात टिकवून ठेवले आणि संधीचा फायदा घेतला.’, असं पॅट कमिन्स पुढे म्हणाला. एडन मार्करमने दुसऱ्या डावात 207 चेंडूंचा सामना केला. 14 चौकार मारत त्याने 136 धावांची खेळी केली. संघाला विजयाच्या वेशीवर आणल्यानंतर हेझलवूडच्या गोलंदाजीवर लवकर विजय मिळवण्याच्या हेतूने फटका मारला आणि हेडने झेल पकडला. पण तिथपर्यंत संपूर्ण सामना दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता.