AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवदत्त पडिक्कलच्या डेब्यूनंतर सोशल मीडियावर भलताच वाद, नेटकरी आपआपसांतच भिडले

आयपीएल गाजवल्यानंतर फलंदाज देवदत्त पडिक्कलने भारत आणि श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत भारतासाठी पहिला सामना खेळला.

देवदत्त पडिक्कलच्या डेब्यूनंतर सोशल मीडियावर भलताच वाद, नेटकरी आपआपसांतच भिडले
देवदत्त पडिक्कल
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 11:54 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे युवा खेळाडूंचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. भारतीय संघ व्यवस्थापन सर्व नव्या दमाचे खेळाडू घेऊन  श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. यावेळी एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर टी-20 मालिकेपूर्वी मात्र भारतीय संघावर कोरोनाचे संकट कोसळले. अष्टपैलू कृणालला कोरोनाची बाधा झाल्यानंतर संघातील महत्त्वाच्या 7 खेळाडूंना देखील विलगीकरणात ठेवण्यात आलं. ज्यामुळे नवख्या खेळाडूंना सामन्यात पदार्पण करवून दुसरा आणि तिसरा टी-20 सामना खेळवला गेला. या खेळांडूमध्ये देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याचाही समावेश होता.

दरम्यान पडिक्कल सामना खेळताना 21 वर्षे 21 दिवसांचा असल्याने तो अत्यंत कमी वयात संघात सहभागी होणाऱ्या खेळाडूसह 2000 सालानंतर जन्मलेला भारतीय वरिष्ठ संघात सहभागी होणारा पहिलाच खेळाडू ठरला असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. ज्यावर इतर नेटकऱ्यांनी टीकास्त्र सोडत यापूर्वी भारतीय महिलांमध्ये शेफाली वर्मा, जेमिमा रॉर्डीग्स अशा 2000 सालानंतर जन्माला आलेल्या महिला क्रिकेटरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्या आहेत, अशी कमेंट करत महिला क्रिकेटलाही योग्य मान देणे गरजेचे असल्याचे बोलून दाखवले.

भारताचा ‘नवा’ प्रयोग फसला

भारताने एकदिवसीय मालिकेदरम्यान पहिले दोन सामने सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात जवळपास 5 खेळाडूंचे एकदिवसीय पदारर्पण करवत तिसरा सामना खेळला. ज्यामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टी-20 मालिकेवेळी पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यावेळी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती घ्यावी लागली. ज्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देऊन एक नवा प्रयोग करण्यात आला. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला ज्यामुळे मालिकाही हातातून निसटली.

इतर बातम्या

IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

(Young Cricketer Devdutt Padikkal debut debate over women cricket on social media)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.