
टीम इंडियाचा असा खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत वन डे आणि टी-20 क्रिकेट मध्ये भारताकडून पदार्पण केलं आहे. मात्र त्याला अजुन कसोटीमध्ये पदार्पण करण्यासाठी संधी मिळालेली नाही.

तो खेळाडू आता काऊंटी क्रिकेट खेळत असून तिथे चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये त्याला कमबॅक करण्याची तो संधी शोधत आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून स्पिनर युजवेंद्र चहल आहे. चहल आता नॉर्थम्प्टनशायर या संघाकडून खेळत आहे. डर्बीशायरविरूद्ध चहलने 45 धावा केल्या आणि 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेमधील पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मात्र अजुनही चहलसाठी कसोटीची दारे काही उघडली नाहीयेत.

दरम्यान, टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ हा काऊंटी क्रिकेट खेळत आहे. मात्र त्याला तिथेही काही यश येताना दिसत नाहीये.