
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने झिंबाब्वेवर पाचव्या आणि अंतिम टी 20 सामन्यात 42 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने यासह ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने विजयी चौकार लगावला. टीम इंडियाने झिंबाब्वेला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर झिंबाब्वेला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. मुकेश कुमार याच्यासमोर झिंबाब्वेने गुडघे टेकले. झिंबाब्वेचा डाव 18.3 ओव्हरमध्ये 125 धावांवर आटोपला. मुकेश कुमारने टीम इंडियाकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच संजू सॅमसन याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. कॅप्टन म्हणून शुबमन गिल याची ही पहिलीच मालिका होती. शुबमनने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवत भारताला युवा सहकाऱ्यांच्या मदतीने मालिका जिंकून दिली. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन शुबमनने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.
शुबमनने अवघ्या 2 शब्दात या मालिकेबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच टीम इंडिया झिंबाब्वे दौऱ्यानंतर जुलैअखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात श्रीलंके विरुद्ध टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शुबमनने या दौऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली. शुबमनने मालिका विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान काय काय म्हटलं? कोणते मुद्दे उपस्थित केले? हे जाणून घेऊयात.
“उत्कृष्ट मालिका. पहिल्या पराभवानंतर आम्ही दाखवलेली भूक पाहण्यासारखी होती. बऱ्याच खेळाडूंची लांब उड्डाणे होती, त्यांना परिस्थितीची सवय नव्हती. ते खेळाडू ज्या पद्धतीनं परिस्थितीशी एकरुप झाले, ते खरंच उल्लेखनीय होतं”, असं शुबमनने म्हटलं. तसेच शुबमनने श्रीलंका दौऱ्याबाबत टिप्पणी केली. “आशिया कप स्पर्धेसाठीमी एकदा श्रीलंकेत गेलो होतो. तिथे जाऊन कामगिरी करण्यास उत्सुक आहे”, असंही शुबमनने जाहीर केलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.