IND vs SA : कॅप्टन सूर्यकुमार शुबमन गिल याला तिसऱ्या सामन्यातून बाहेर करणार?
India vs South Africa 3rd t20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 टी 20i सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केली. टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल हा या मालिकेत आतापर्यंत अपयशी ठरला आहे.

कटकमधील बाराबती स्टेडियम आणि चंडीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमनंतर आता टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्याचा थरार हा धर्मशालेत रंगणार आहे. जगातील सर्वोत्तम पैकी एक अशा असलेल्या या स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. सध्या ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना फार अटीतटीचा असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. शुबमन पहिल्या दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव शुबमनला तिसऱ्या सामन्यातून बाहेर करण्याची हिंमत दाखवणार का? असा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
तिसरा सामना 14 डिसेंबरला एचपीसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना हा 101 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकने 51 धावांनी मात केली. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडियाचं पराभवानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. मात्र त्यासाठी टीम इंडियाला चांगली कामगिरी करावी लागेल.
टॉप ऑर्डरवर जबाबदारी
अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या या टॉप ऑर्डरमधील 3 फलंदाजांनी पहिल्या दोन्ही सामन्यात निराशा केलीय. अभिषेकला सुरुवात मिळाली. मात्र त्याला ती खेळी मोठ्या आकड्यात बदलता आली नाही. सूर्यकुमारचा फ्लॉप शो सातत्याने कायम आहे. तर शुबमनने 2 सामन्यात निराशा केली. शुबमनने मालिकेत आतापर्यंत अनुक्रमे 17 आणि 4 अशा एकूण 21 धावा केल्या आहेत. त्यामुळे कॅप्टन सूर्या शुबमनला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची हिंमत दाखवणार का? असा आव्हानात्मक प्रश्न चाहत्यांकडून केला जात आहे.
सूर्या कॅप्टन असल्याने त्याला तर बाहेर करता येणार नाही. त्यामुळे सूर्या कॅप्टन या नात्याने शुबमनचा पत्ता कट करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसंच शुबमनला बाहेर बसवल्यास प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन याला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र टीम मॅनेजमेंट शुबमनला 1 संधी देऊ शकते. त्यामुळे शुबमनबाबत अंतिम निर्णय काय होतो? हे पाहण्यासारखं असणार आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह
