AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडेतीन वर्षांची प्रतीक्षा अन् थेट तेंडुलकरचा विक्रम मोडीत! झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहास

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा प्रदीर्घ वनडे सामने खेळण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम अखेर मोडीत निघाला आहे. साडे तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने हा विक्रम मोडीत काढला आहे.

साडेतीन वर्षांची प्रतीक्षा अन् थेट तेंडुलकरचा विक्रम मोडीत! झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहास
साडेतीन वर्षांची प्रतीक्षा अन् थेट तेंडुलकरचा विक्रम मोडीत! झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहासImage Credit source: Instagram/TV9 Network
| Updated on: Sep 15, 2026 | 3:55 PM
Share

झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार ब्रँडन टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच टेलरने भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम मोडीत काढला. 40 वर्षीय टेलर आता पुरुष एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक प्रदीर्घ काळ खेळणारा जगातील नंबर1 खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला आणि प्लेइंग 11 मध्ये ब्रँडन टेलरचं नाव येतात हा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यासह ब्रँडन टेलरची एकदिवसीय कारकीर्द आता 22 वर्षे आणि चार महिन्यांची झाली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची एकदिवसीय कारकीर्द 22 वर्षे आणि तीन महिने चालली होती. सचिन तेंडुलकरने 2012 मध्ये या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. पण आता ब्रँडन टेलरची एकदिवसीय कारकीर्द ही 22 वर्षे आणि चार महिन्यांची झाली असून पुडे निघून गेला आहे. मात्र असं असलं तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18426 धावा आणि सर्वाधिक 463 सामने खेळण्याचा विश्वविक्रम अजूनही सचिन तेंडुलकर यांच्याच नावावर अबाधित आहे.

ब्रँडन टेलरने 2004 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट इतिहासातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक बनला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यापूर्वी त्याने 207 सामन्यांमध्ये 11 एकदिवसीय शतके झळकावली होती. हा झिम्बाब्वेसाठी एक राष्ट्रीय विक्रम आहे. टेलरने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु 2022 मध्ये आयसीसीच्या लाचलुचपत आणि उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर साडेतीन वर्षांची कठोर बंदी घालण्यात आली होती.

आपल्या निलंबनाची ही साडेतीन वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर 2025 मध्ये त्याने निवृत्ती मागे घेत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. झिम्बाब्वे संघ दक्षिण आफ्रिका आणि नामिबियासोबत 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे सह-आयोजन करत आहे. या आगामी घरच्या विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या जिद्दीने टेलरने मैदानावर पुनरागमन केले आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने जागतिक कीर्तीचा पराक्रम गाजवला आहे.

Follow Us
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक