CJP आंदोलनावर स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; विद्यार्थ्यांना दिला महत्वाचा संदेश, नेमकं काय म्हटलं?

CJP Protest : ईशान किशनने विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

CJP आंदोलनावर स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; विद्यार्थ्यांना दिला महत्वाचा संदेश, नेमकं काय म्हटलं?
| Updated on: Jul 24, 2026 | 2:15 PM

देशभरातील नागरिकांचं दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे लक्ष लागलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन देशभर पसरलं आहे. देशभरातील विविध भागातून कॉकरोच जनता पार्टीला समर्थन मिळत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर 20 जुलै रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर हे आंदोलन चिघळल्याचं दिसून आलं. या आंदोलनावर भारताचा स्टार खेळाडू ईशान किशननेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला आहे.

ईशानचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा 

ईशान किशनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली. त्याने या पोस्टमधून आंदोलनात सहभागी होणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिला आहे. या प्रकरणात लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. त्याने म्हटलं की, ‘तुम्ही सर्व कठीण काळाचा सामना करत आहात. माझ्या संवेदना सोबत आहेत. मला आशा आहे की, हे प्रकरण लवकरच सुटेल. तुम्हाला न्याय मिळून पुढे जाण्याची संधी मिळेल’.

 

ईशानसहित शुभमनची खास पोस्ट

ईशान किशनच्या आधी भारताचा कर्णधार शुभमन गिलनेही विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘एक तरुण भारतीय (Indian) म्हणून माझा विश्वास आहे की, आपल्या पीढीला शिक्षणाची संधी मिळेल. तुम्हाला स्वप्न पाहणे आणि भविष्यात पूर्ण करण्याची संधी मिळेल. मी प्रत्येक युवकांचा आदर करतो. तुम्ही सर्वांनी शांततेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण हे देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. विद्यार्थी हिताच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल, अशी मला आशा आहे’. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही विद्यार्थ्यांसाठी खास पोस्ट केली.

ईशान किशनने यंदा झिम्बॉब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत व्यग्र आहे. त्याने या मालिकेच्या पहिल्या सामन्यात 24 चेंडूत 35 धावा काढल्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. या सामन्यात टीम इंडियाने 13.2 षटकात 126 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us