Pat Cummins : कमिन्स विचारतो ‘मुंबईत काय खाऊ?’, चाहते म्हणतायत ‘अरे भई बस्स क्या वडापाव है ना !’

चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद देखील दिलाय. त्याचं झालं असं की, पॅट कमिन्सने सोशल मीडियावर प्रश्न विचारला कि मी मुंबईत आहे तर मला सुचवा कि मुंबईतला कोणता स्थानिक पदार्थ चाखायला पाहिजे. त्याच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस केला !

Pat Cummins : कमिन्स विचारतो मुंबईत काय खाऊ?, चाहते म्हणतायत अरे भई बस्स क्या वडापाव है ना !
पॅट कमिन्स
Image Credit source: facebook
| Updated on: May 06, 2022 | 1:04 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) चे सर्वाधिक लीग सामने हे मुंबईत (Mumbai) खेळवले जातायत. त्यामुळे अर्थातच आयपीएलचे खेळाडू गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतच आहेत. आता मुंबईत येऊन वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्ला ना ? कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्स (Pat Cummins) ने याच संदर्भातलं एक ट्विट केलंय जे ट्विटरवर जाम व्हायरल झालंय. चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद देखील दिलाय. त्याचं झालं असं की, पॅट कमिन्सने सोशल मीडियावर प्रश्न विचारला कि मी मुंबईत आहे तर मला सुचवा कि मुंबईतला कोणता स्थानिक पदार्थ चाखायला पाहिजे. त्याच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस केला !

‘माझे मुंबईतील फॉलोवर्स, जेवणासाठी मी कोणता स्थानिक पदार्थ चाखून पाहायला पाहिजे, कारण मी इथे आहे.’ असं ट्विट कमिन्सने केलं ज्यावर वेगवेगळी भन्नाट उत्तरं आली. एका युजरने त्याला मुंबईचा प्रसिद्ध वडापाव खाण्याचं सुचवले आहे. यावर कमिन्सनेही उत्तर दिले आहे. त्याने लिहिले, ‘वडापाव छान वाटत आहे, मी याआधी कधी खाल्लेला नाही.’

अनेकांनी कमिन्सला पावभाजी खाण्यासही सुचवलंय ज्यावर कमिन्स चक्क पावभाजीचा फोटो शेअर करत हाच पदार्थ चाखल्याचं सांगतो. एका युजरने पावभाजीबद्दल प्रतिक्रिया देण्यास सांगितल्यानंतर कमिन्सने लिहिले की, ‘वाह, मी गेले 11 वर्षे भारतात येत आहे, पण कसं काय यापूर्वी हा पदार्थ चाखला नव्हता. मस्त.’

कमिन्सची आयपीएल २०२२ मधील कामगिरी समाधानकारक झाली आहे. त्याने आत्तापर्यंत या हंगामात 4 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी करताना त्याने एका अर्धशतकासह 63 धावा केल्या आहेत.