AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 सामने, 24 चौकार, 1 धडाकेबाज शतक, IPL अगोदर डेव्हिड वॉर्नरचा ट्रेलर, पिक्चर बाकी…

आयपीएल 2021 (IPL 2021) फिल्म यायची बाकी आहे त्याच्याअगोदरच ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आयपीएलचा पिक्चर कसा असेल, याचा ट्रेलर दाखवला आहे.

2 सामने, 24 चौकार, 1 धडाकेबाज शतक, IPL अगोदर डेव्हिड वॉर्नरचा ट्रेलर, पिक्चर बाकी...
David warner
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 18, 2021 | 3:08 PM
Share

मुंबईआयपीएल 2021 (IPL 2021) फिल्म यायची बाकी आहे त्याच्याअगोदरच ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आयपीएलचा पिक्चर कसा असेल, याचा ट्रेलर दाखवला आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जो गोलंदाज समोर येईल त्याच्यावर वॉर्नरने आक्रमण केलं. 2 मॅचमध्ये त्याने 24 खणखणीत चौकार लगावले तर एक धडाकेबाज शतकही साजरं केलं. त्यामुळे अगदी काही दिवसांपासून येऊन ठेपलेल्या आयपीएल सामन्यांत वॉर्नरची बॅट तळपणार, याची खात्री क्रिकेट चाहत्यांना आहे. (David warner terrific Form 2 Match 24 boundries And 1 Hundred Ahead IPL 2021)

वॉर्नरच्या खेळीने टीम न्यू साऊथ वेल्स विजयी

ऑस्ट्रेलियातील वनडे टूर्नामेंटच्या मार्श कपमध्ये तस्मानियाविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने धमाकेदार खेळी केली. या सामन्यात रन्सचा पाठलाग करताना वॉर्नरने टीम न्यू साऊथ वेल्ससाठी धडाकेबाज शतक ठोकलं. पहिल्यांदा बॅटिंग करताना तस्मानियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 258 रन्स केले. प्रत्युत्तरादाखल वॉर्नरने बहारदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 7 चेंडू शिल्लक असताना गडी विकेट्सने टीम न्यू साऊथ वेल्सने विजय नोंदवला.

वॉर्नरचं धमाकेदार शतक

डावखुऱ्या डेव्हिड वॉर्नरने या मॅचमध्ये 115 बॉलमध्ये 10 चौकारांच्या साथीने 108 रन्स केले. या खेळीदरम्यान दुसऱ्या विकेट्ससाठी त्याने मोजेज हेनरिक्सच्या साथीने शतकी भागीदारी केली.

दुखापतीतून सावरल्यानंतर दमदार अर्धशतक

याअगोदर वॉर्नरने 4 मार्च रोजी साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये दुखापतीतून सावरत दमदार अर्धशतक ठोकलं. त्यावेळेही रन्सचा पाठलाग करताना 74 बॉलमध्ये त्याने 87 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार लगावला.

2 मॅच, 24 फोर, 195 रन्स, आयपीएलअगोदर वॉर्नरच्या बॅटिंगचा ट्रेलर

वॉर्नरने 2 मॅचमध्ये 24 खणखणीत चौकार लगावले तर एक धडाकेबाज शतकही साजरं केलं. वॉर्नरने पहिल्या सामन्यात दमदार 87 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 108 धावा काढल्या. एकंदरित दोन सामन्यात त्याने 195 धावा ठोकल्या. म्हणजे 97.5 च्या सरासरीने त्याने दोन्ही सामन्यात खेळी केल्या.

(David warner terrific Form 2 Match 24 boundries And 1 Hundred Ahead IPL 2021)

हे ही वाचा :

इरफान पठाणकडून आतापर्यंतची सगळ्यात खराब ओव्हर, ‘सचिन पाजी’च्या मार्गदर्शनाने जोरदार कमबॅक!

मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, फलंदाजांची धमाल, केवळ 4 चेंडूत वन डे मॅच जिंकली, नेमकं काय घडलं?

Video : मैदानात सचिन-युवीचं वादळ, चौकार षटकारांची बरसात, इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिजला लोळवलं!

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...