AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मैदानात सचिन-युवीचं वादळ, चौकार षटकारांची बरसात, इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिजला लोळवलं!

इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडिया लिजेंड्स (india legends Vs west indies legends) यांच्यातील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety World Series) सेमी फायनलमध्ये इंडिया लिजेंड्सने बाजी मारली.

Video : मैदानात सचिन-युवीचं वादळ, चौकार षटकारांची बरसात, इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिजला लोळवलं!
सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग
| Updated on: Mar 18, 2021 | 8:47 AM
Share

मुंबई :  इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडिया लिजेंड्स (india legends Vs west indies legends) यांच्यातील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety World Series) सेमी फायनलमध्ये इंडिया लिजेंड्सने बाजी मारली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला तर सचिनच्या धमाकेदार खेळीनंतर युवराजने (yuvraj Singh) मैदानात गगनचुंबी षटकारांचा पाऊस पाडला. सचिन-युवीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिज लिजेंड्सला 12 रन्सनी धूळ चारुन फायनलमध्ये प्रवेश मिळवला. (Sachin tendulkar And Yuvraj Singh best knock Vs west indies legends in Road Safety World Series)

सचिन-वीरुचं आक्रमण

वेस्ट इंडिजविरुद्ध डावाची सुरुवात करण्यासाठी भारताची सदाबहार जोडी सचिन-सेहवाग मैदानात उतरली. अगदी पहिल्या बॉलपासून सचिन-सेहवागने आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या 5.3 ओव्हरमध्येच या जोडीने 57 धावा केल्या. यामध्ये सेहवागने 17 बॉलमध्ये 35 रन्सची आक्रमक इनिंग खेळली. बेस्टने त्याला आपल्याच गोलंदाजीवर चकवत झेल देण्यास भाग पाडलं.

सचिनचा मास्टर क्लास

वीरेंद्र सेहवाग आऊट झाल्यानंतर सचिनने डावाची सूत्रे हातात घेतली. सचिनने 42 बॉलमध्ये 65 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि तीन उत्तुंग षटकार लगावले. या खेळीने त्याने सिरीजमध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं.

युवीचा आक्रमक अंदाज

युवराजने पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले (Yuvraj Singh hit 4 Six In one over) आहेत. 19 व्या ओव्हरमध्ये लागोपाठ तीन षटकार आणि एक बॉल मिस झाल्यानंतर पुन्हा पुढच्या बॉलवर षटकार ठोकत त्याने त्याच्याच 6 षटकारांची आठवण पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना करुन दिली आहे. युवराज सिंगने 20 चेंडूत 49 धावांची धमाकेदार इनिंग खेळली. यामध्ये त्याने 6 गगनचुंबी षटकार आणि एक खणखणीत चौकार लगावला. कालच्या याच खेळीच्या जोरावर त्याने सिरीजमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर करुन घेतला आहे.

इंडिया लिजेंड्सचं वेस्ट इंडिजला 218 धावांचं लक्ष्य

सेहवागने (Virendra Sehwag) 17 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केली. सचिनने 42 बॉलमध्ये 65, युसुफ पठाणने (yusuf pathan) 20 बॉलमध्ये 37 तर युवराजने 20 बॉलमध्ये 49 धावा कुटल्या. भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने निर्धआरित 20 षटकांमध्ये 3 गडी बाद 218 धावांचं लक्ष्य वेस्टइंडिज समोर ठेवलं.

इंडिया लिजेंड्सने दिलेल्या 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिजकडून ड्वेन स्मिथ आणि विल्यम पर्कीन्स मैदानात उतरले. परंतु भारताच्या मनप्रीत गोनीने पर्कीन्सला स्वस्तात माघारी धाडलं. अवघ्या 6 धावांवर त्याचा गोनीने त्रिफळा उडवला. त्यानंतर स्मिथ आणि नरसिंगने वेस्ट इंडिजच्या जावाला आकार दिला. स्मिथने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली तर नरसिंगने 44 चेंडूत 59 धावांची खेळी केली. ते दोघे मैदानात असताना वेस्ट इंडिज मॅच जिंकेल असं वाटतं होतं. मात्र स्मिथचा अडथळा इरफानने दूर केला तर विनय कुमारने नरसिंगला रन आऊट केलं.

भारताची फायनलमध्ये धडक

त्यानंतर मैदानात उतरलेला एडवर्डसही शून्यावर आऊट झाला. कर्णधार ब्रायन लारावर मोठ्या खेळीची जबाबदारी होती. त्याने काही काळ चांगली फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूत 46 धावा फटकावल्या. त्याचाही काटा विनय कुमारने काढत क्लीन बोल्ड केलं. अशा प्रकारे निर्धारित 20 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने 06 गडी बाद 206 धावा केल्या. 12 रन्सनी भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.

हे ही वाचा :

Video : सिंग इज किंग… युवराजची बॅट पुन्हा तळपली, एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार, पाहा व्हिडीओ…

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.