Video : सिंग इज किंग… युवराजची बॅट पुन्हा तळपली, एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार, पाहा व्हिडीओ…

युवराज सिंगने (Yuvraj Singh) पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले (Yuvraj Singh hit 4 Six In one over) आहेत.

Video : सिंग इज किंग...  युवराजची बॅट पुन्हा तळपली, एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार, पाहा व्हिडीओ...
युवराजचे एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार

मुंबई : युवराज सिंगने (Yuvraj Singh) पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले (Yuvraj Singh hit 4 Six In one over) आहेत. 19 व्या ओव्हरमध्ये लागोपाठ तीन षटकार आणि एक बॉल मिस झाल्यानंतर पुन्हा पुढच्या बॉलवर षटकार ठोकत त्याने त्याच्याच 6 षटकारांची आठवण पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना करुन दिली आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या ( Road Safety World Series) सेमी फायनल मॅचमध्ये युवराज सिंगने ही कमाल केली. (Yuvraj Singh hit 4 Six In One over Road Safety World Series 2021 Semi Final match)

युवीचे 19 व्या ओव्हरमध्ये चार षटकार

इंडिया लिजेंड्स (india legends) विरुद्ध वेस्ट इंडिज लिजेंड्स (West indies legends) यांच्यातल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या सेमी फायनलच्या सामन्यात (Road Safety World Series 2021 Semi Final) प्रथम बॅटिंग करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) धुव्वाधार बॅटिंग केली. सचिनने 42 बॉलमध्ये 65 रन्स काढले. त्यानंतर मैदानावर आलेल्या युवीने आपल्या बॅटिंगने चाहत्यांनी मने जिंकली. 19 व्या ओव्हरमध्ये त्याने 4 षटकार लगावले. ज्यामधले 3 षटकार त्याने लागोपाठ खेचले.

युवीच्या 20 बॉलमध्ये 49 धावा, सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युवीच्या नावावर

युवराज सिंगने 20 चेंडूत 49 धावांची धमाकेदार इनिंग खेळली. यामध्ये त्याने 6 गगनचुंबी षटकार आणि एक खणखणीत चौकार लगावला. कालच्या याच खेळीच्या जोरावर त्याने सिरीजमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर करुन घेतला आहे.

सचिन-सेहवागची आक्रमक सुरुवात, युवीचा दिलखेचक अंदाजात शेवट

सचिन आणि सेहवागने (Virendra Sehwag) इंडिया लिजेंड्सची धमाकेदार सुरुवात केली. आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या अंदाजात बॅटिंग केली. त्याने 17 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केली. सचिनने 42 बॉलमध्ये 65, युसुफ पठाणने (yusuf pathan) 20 बॉलमध्ये 37 तर युवराजने 20 बॉलमध्ये 49 धावा कुटल्या. भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने निर्धआरित 20 षटकांमध्ये 3 गडी बाद 218 धावांचं लक्ष्य वेस्टइंडिज समोर ठेवलं.

पाहा व्हिडीओ :

टायगर अभी जिंदा हैं…

शनिवारी (दि 13 मार्च) पार पडलेल्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजच्या (World Safety Series) इंडिया लिजेंड्स (India legends) विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजेंड्स (South Africa Legends) यांच्यातील सामन्यात युवराज सिंगने एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार लगावले. 18 व्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारत त्याने त्याच्याच 6 षटकारांची आठवण पुन्हा क्रिकेट रसिकांना करुन दिली.

युवराज सिंगने 22 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्याने या खेळीला 6 षटकार आणि 2 चौकारांचा साज चढवला. नाबाद 52 धावा करताना ‘टायगर अभी जिंदा हैं…’ हेच त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं.

इंडिया लिजेंड्सने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 204 धावांचा डोंगर उभा केला. याच्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या 60, युवराजच्या नाबाद 52 तर एस. बद्रीनाथच्या 42 धावांचा समावेश आहे. युसूफ पठाणने 23 आणि मनप्रीत गोनीने 16 धावांचं योगदान दिलं.

(Yuvraj Singh hit 4 Six In One over Road Safety World Series 2021 Semi Final match)

हे ही वाचा :

Video : टायगर अभी जिंदा हैं… युवीचे एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार, पाहा डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI