इरफान पठाणकडून आतापर्यंतची सगळ्यात खराब ओव्हर, ‘सचिन पाजी’च्या मार्गदर्शनाने जोरदार कमबॅक!

इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लिजेंडस यांच्यातील मॅचमध्ये इरफान पठाणने त्याची पहिली ओव्हर अतिशय खराब टाकली. 6 बॉल टाकण्याऐवजी त्याला एकाच ओव्हरमध्ये 11 बॉल टाकावे लागले. | Irfan Pathan

इरफान पठाणकडून आतापर्यंतची सगळ्यात खराब ओव्हर, 'सचिन पाजी'च्या मार्गदर्शनाने जोरदार कमबॅक!
irfan pathan And Sachin Tendulkar
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 1:51 PM

मुंबई : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या ((Road Safety World Series) इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लिजेंडस (India legends vs West indies legends) यांच्यातील मॅचमध्ये इरफान पठाणने (Irfan Pathan) त्याची पहिली ओव्हर अतिशय खराब टाकली. 6 बॉल टाकण्याऐवजी त्याला एकाच ओव्हरमध्ये 11 बॉल टाकावे लागले. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मार्गदर्शनानंतर त्याने सामन्यात पुनरागमन करत अशी कामगिरी केली की मॅचच्या हिरोपैकी तो एक हिरो होता. (Road Safety World Series irfan pathan Worst over Sachin tendulkar Advice help Comeback)

इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडिया लिजेंड्स (india legends Vs west indies legends) यांच्यातील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety World Series) सेमी फायनलमध्ये इंडिया लिजेंड्सने बाजी मारली. सचिन-युवीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिज लिजेंड्सला 12 रन्सनी धूळ चारली. या विजयाचे सचिन युवी तर नायक आहेतच पण इरफान देखील या विजयाचा नायक आहे. पहिली ओव्हर अत्यंत गचाळ टाकल्यानंतर सचिन पाजीचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करत इरफानने मॅचविनिंग प्रदर्शन केलं.

इरफानची 11 बॉलची एक ओव्हर

इरफान पठाणने बोलिंगची सुरुवात अतिषय खराब केली. मी आतार्यंतची सगळ्यात खराब बोलिंग केली, हे त्यानेच मान्य केलं. एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 वाईड बॉल टाकले. त्यामुळे त्याला एका ओव्हरमध्ये 11 बॉल फेकावे लागले. त्याच्या या ओव्हरमध्ये 19 रन्स निघाल्या.

पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स, नंतरच्या 3 ओव्हरमध्ये 29

सेमी फायनलच्या सामन्यात इरफान पठाणने 4 ओव्हसमध्ये 48 रन्स दिले. यातील 19 रन्स पहिल्याच ओव्हरमध्ये आले. बाकीच्या तीन ओव्हरमध्ये 29 रन्स आहे. इरफानने ज्या प्रकारे बोलिंगची सुरुवात केली तश्या प्रकारे अजिबात शेवट केला नाही. सचिन तेंडुलकरच्या म्हणण्यानुसार त्याने धैर्य न सोडता गोलंदाजी केली.

सचिनच्या मार्गदर्शनानंतर इरफानचं मॅचमध्ये कमबॅक

पहिली ओव्हर अत्यंत खराब पडल्यानंतर सचिनने इरफानचा आत्मविश्वास वाढवला. याच बळावर त्याने पुढच्या तीन ओव्हरमध्ये भेदक गोलंदाजी केली. तसंच गरजेवेळी विडिंडच्या खतरनाक ठरणाऱ्या बॅट्समन स्मिथला त्याने माघारी घाडलं. सरतेशेवटी इंडिया लिजेंड्सने 12 धावांची वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली.

हे ही वाचा :

अफगाणिस्तानच्या 19 वर्षीय बॅट्समनचा धमाका, 45 चेंडूत 87 धावा, केला शानदार रेकॉर्ड

Ind Vs Eng : चौथ्या टी ट्वेन्टीत विराटची प्लेइंग 11 कोणती? केएल राहुलचं काय होणार? चाहरला संधी मिळणार?

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.