AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Eng : चौथ्या टी ट्वेन्टीत विराटची प्लेइंग 11 कोणती? केएल राहुलचं काय होणार? चाहरला संधी मिळणार?

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालची भारतीय क्रिकेट टीम पुन्हा एकदा करो या मरोच्या स्थितीत आहे. India Vs England T20

Ind Vs Eng : चौथ्या टी ट्वेन्टीत विराटची प्लेइंग 11 कोणती? केएल राहुलचं काय होणार? चाहरला संधी मिळणार?
Ind Vs Eng 4th t20
| Updated on: Mar 18, 2021 | 11:09 AM
Share

अहमदाबादविराट कोहलीच्या (Virat kohli) नेतृत्वाखालची भारतीय क्रिकेट टीम पुन्हा एकदा करो या मरोच्या स्थितीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने पिछाडीवर आहे (India Vs England). तिन्ही टी ट्वेन्टी सामन्यात विराट कोहलीने प्लेइंग 11 मध्ये बदल केले होते. त्यामुळे आता चौथ्या आणि ‘करो या मरो’च्या स्थितीत विराटची प्लेइंग 11 काय असेल, याची चर्चा सध्या रंगली आहे. (Virat kohli indian team playing Eleven For Fourth t20 match Vs England)

इंग्लंडने पहिली टी ट्वेन्टी मॅच 8 विकेट्सने जिंकली तर भारताने दुसरी मॅच 7 विकेट्सने जिंकत मालिकेतील पहिली टी ट्वेन्टी जिंकली. तिसऱ्या टी ट्वेन्टीत मात्र पाहुण्या इंग्लंडने पुन्हा एकदा भारताला पराभवाची धूळ चारली. आतापर्यंतच्या तिन्ही टी ट्वेन्टी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने प्लेईंग 11 मध्ये बदल केले आहेत. त्यामुळे करो या मरोच्या सामन्यात कुणाला नव्याने संधी मिळणार तर कुणाला बॅक बेंचवर पसायला लागणार, याविषयी चर्चा रंगते आहे.

के.एल.राहुलचा खराब फॉर्म, तरीही संघातली जागा कायम

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज के.एल.राहुलचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत राहुलला खातेही उघडता आले नाही. तरीही विराटने त्याचा संघात समावेश केला. आताही चौथ्या सामन्यात के.एल.चा समावेश होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

आजच्या चौथ्या सामन्यात राहुलचा समावेश जर झाला तर आज ओपनिंग ऐवजी तो चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. तर रोहितबरोबर सलामीला इशान किशन खेळताना दिसू शकतो. नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेन. श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याच्या खेळावर भारतीय क्रीडा रसिकांची नजर असेल.

युजवेंद्र चहलऐवजी राहुल चाहरला संधी?

पहिल्या तीनही सामन्यात युजवेंद्र चाहलवर विराट कोहलीने विश्वास दाखवला. पण त्या विश्वासाला चहल खरा उतरला नाही. त्याचा तीनही सामन्यांतला परफॉर्मन्स म्हणावा असा खास नव्हता. त्याचा इकोनॉमी रेट अधिक होता. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये त्याचा संघात समावेश होई की नाही, याची शाश्वती नाही. त्याच्याऐवजी विराट राहुल चाहरला संधी देऊ शकतो.

अशी असू शकते टीम इंडिया…

रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड़्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्‍वर कुमार, शार्दुल ठाकुर.

(Virat kohli indian team playing Eleven For Fourth t20 match Vs England)

हे ही वाचा :

देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन

Video : मैदानात सचिन-युवीचं वादळ, चौकार षटकारांची बरसात, इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिजला लोळवलं!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.