AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन

zlatan ibrahimovic returns : एका निवृत्त घेतलेल्या खेळाडूचं पुनरागमन होणार आहे. ज्लाटान इब्राहिमनोविच (zlatan ibrahimovic) हा निवृत्तीच्या 5 वर्षांनी मैदानात परतणार आहे.

देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन
zlatan ibrahimovic
| Updated on: Mar 18, 2021 | 11:01 AM
Share

इंटरनॅशनल फुटबॉल (Football world cup) जगतात एका निवृत्त घेतलेल्या खेळाडूचं पुनरागमन होणार आहे. ज्लाटान इब्राहिमनोविच (zlatan ibrahimovic) हा फुटबॉलपटू निवृत्तीच्या 5 वर्षांनी मैदानात परतणार आहे. ज्लाटान इब्राहिमनोविच हा स्टार स्ट्राईकर आहे. स्वीडनकडून तो पुन्हा फुटबॉल खेळताना दिसणार आहे. ज्लाटान इब्राहिमनोविच सध्या 39 वर्षांचा आहे. महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरिस होणाऱ्या वर्ल्ड कप क्वालिफायर संघात ज्लाटान इब्राहिमनोविचला स्थान मिळालं आहे. स्वीडनचे (Sweden) फुटबॉट टीमचे हेड कोच जॅनी एंडरसन यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

स्वीडनचा स्टार स्ट्राईकर असलेल्या ज्लाटान इब्राहिमनोविचने स्वत:ही सोशल मीडियावर पोस्ट करुन, आपण पुनरागमन करत असल्याचं म्हटलं आहे. ‘द रिटर्न ऑफ द गॉड’ असं म्हणत त्याने फुटबॉल किटमधील आपला फोटो शेअर केला आहे.

ज्लाटानची कारकीर्द

AC Milan क्लबचा स्टार स्ट्राईकर ज्लाटान इब्राहिमनोविचने स्वीडनसाठी 2016 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्याने आंतरराष्ट्रीय 116 सामन्यात तब्बल 62 गोल डागले होते. युरोपीयन चॅम्पियन्सशीपनंतर ज्लाटानने फुटबॉल विश्वाला अलविदा केला होता.

वर्ल्डकपसाठी 5 वर्षांनी पुन्हा मैदानात

निवृत्तीच्या पाच वर्षांनी ज्लाटान इब्राहिमनोविच मैदानात उतरत आहे. सर्वात आधी तो स्वीडनकडून वर्ल्डकप क्वालिफायर मॅचमध्ये खेळणार आहे. स्वीडनचा सामना कोसोवोसोबत आहे. फुटबॉलचा पुढील वर्ल्डकप पुढील वर्षी खेळला जाणार आहे.

स्वीडनचा पहिला सामना 25 मार्चला जॉर्जियाविरुद्ध आहे. तर दुसरा सामना कोसोवो विरुद्ध असून, या सामन्यात ज्लाटान इब्राहिमनोविच खेळणार आहे.

संबंधित बातम्या 

Video : मैदानात सचिन-युवीचं वादळ, चौकार षटकारांची बरसात, इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिजला लोळवलं!

Video : सिंग इज किंग… युवराजची बॅट पुन्हा तळपली, एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार, पाहा व्हिडीओ…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.