यंदाचा सर्वोत्तम गोलंदाज IPL मधून आऊट

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

मुंबई : यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज आयपीएलमधून बाहेर पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकीचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा मायदेशी परतणार आहे. 12 सामन्यात 25 विकेट घेत पर्पल कॅप मिळवणारा रबाडा आता दिल्लीकडून उर्वरीत सामने खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रबाडाला विश्रांतीचा सल्ला दिल्याने तो मायदेशी परतत आहे. त्यामुळे […]

यंदाचा सर्वोत्तम गोलंदाज IPL मधून आऊट
Follow us on

मुंबई : यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज आयपीएलमधून बाहेर पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकीचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा मायदेशी परतणार आहे. 12 सामन्यात 25 विकेट घेत पर्पल कॅप मिळवणारा रबाडा आता दिल्लीकडून उर्वरीत सामने खेळू शकणार नाही.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रबाडाला विश्रांतीचा सल्ला दिल्याने तो मायदेशी परतत आहे. त्यामुळे चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.

सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये रबाडाने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 12 सामन्यात 25 विकेट्स घेत, गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं. रबाडाच्या गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सही पहिल्या स्थानावर पोहोचलीच, शिवाय त्यांनी प्लेऑफमध्येही प्रवेश केला.

23 वर्षीय रबाडा म्हणाला, “सध्या दिल्लीने प्लेऑफपर्यंत मजल मारली असताना, अशा स्थितीत दिल्लीची साथ सोडणं दु:खद आहे. विश्वचषक तोंडावर असल्याने सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मला स्वदेशी परतावं लागत आहे. माझ्यासाठी हा हंगाम मैदानावर आणि मैदानाबाहेर जबरदस्त होता. मला आशा आहे की माझा संघ यंदा आयपीएलचा किताब पटकावेल”.

दरम्यान, वर्ल्डकमध्ये 30 मे रोजी दक्षिण आफ्रिकेचा यजमान इंग्लंडविरुद्ध उद्घाटनाचा सामना होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सला झटका

रबाडा संघाबाहेर गेल्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी हा झटका असेल. दिल्ली कॅपिटल्स पहिल्यांदाच इथवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीची गोलंदाजीची धुरा रबाडाने सार्थपणे सांभाळली होती. आता दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा लीग फेरीतील अंतिम सामना होत आहे.