AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs SRH Live मॅचमध्ये राडा, हैदराबादाचा हा मोठा खेळाडू संजू सॅमसनकडे पाहून थुंकला, खुन्नसचा असा घेतला बदला

CSK vs SRH : आयपीएलमध्ये राडे अजिबात नवीन नाहीत. काल सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात हेच पहायला मिळालं. हैदराबादचा एक प्लेयर संजू सॅमसनकडे पाहून थुंकला. या सामन्यातील एका टीमला प्लेऑफच तिकीट पक्कं झालं.

CSK vs SRH Live मॅचमध्ये राडा, हैदराबादाचा हा मोठा खेळाडू संजू सॅमसनकडे पाहून थुंकला, खुन्नसचा असा घेतला बदला
CSK vs SRHImage Credit source: Screengrab/JioHotstar
| Updated on: May 19, 2026 | 11:58 AM
Share

आयपीएल 2026 मध्ये काल चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. दोन्ही टीम्ससाठी प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा सामना होता. त्यामुळे दोन्ही टीम्ससाठी विजय आवश्यक होता. रोमांचक झालेला हा सामना सनरायजर्स हैदराबादने एक ओव्हर राखून जिंकला. चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग यामुळे अजून खडतर बनला आहे. दरम्यान या मॅचमध्ये एक राडा सुद्ध पहायला मिळाला. भारताचा संजू सॅमसन शांत स्वभावाचा खेळाडू मानला जातो. पण कालच्या सामन्यात हेनरिक क्लासेन सोबत त्याची वादावादी झाली. हेनरिक क्लासेन हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हेनरिक क्लासेनने दमदार बॅटिंग केली. 15 व्या ओव्हरमध्ये क्लासेन आऊट झाला. त्यात संजू सॅमसनची महत्वाची भूमिका होती.

त्यानंतर क्लासेन आणि सॅमसनमध्ये वादावादी झाली. क्लासेन या भांडणामुळे इतका रागवला की तो सॅमसनकडे बघून थुंकला. क्लासेनने या सामन्यात 26 चेंडूत 47 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याने इशान किशनसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. त्याची खेळी हैदराबादला प्लेऑफमध्ये घेऊन जाण्यात महत्वपूर्ण ठरली. सॅमसन आणि क्लासेनमध्ये 15 व्या ओव्हरमध्ये वादावादी झाली. नूर अहमदच्या तिसऱ्या चेंडूवर क्लासेनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो गुगलीवर फसला. क्लासेनने पाय उचलताच संजू सॅमसनने त्याची स्टम्पिंग केली. क्लासेनला वाटतं होतं की, तो आऊट नाहीय. पण तिसऱ्या अंपायरने त्याला बाद दिलं.

त्याच्याकडे नजर रोखून पाहत होता

त्यानंकर संजू सॅमसन त्याच्याकडे नजर रोखून पाहत होता. क्लासेनला ही गोष्ट आवडली नाही. दोघांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. खेळाडू मध्ये पडले. त्यानंतर क्लासेन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण क्लासेन मागे वळला व सॅमसनकडे पाहून थुंकला. हेनरिक क्लासेनने स्पिन फ्रेंडली विकेटवर चांगली बॅटिंग केली. क्लासेनने या कठीण पीचवर 180.77 च्या स्ट्राइक रेटने 26 चेंडूत 47 धावा केल्या. क्लासेन आणि इशान किशनने तिसर्‍या विकेटसाठी 41 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. या पार्टनरशिपने संपूर्ण मॅच पलटली. सनरायजर्स हैदराबादने 5 विकेट राखून हा सामना जिंकला. टीमने 181 धावांचं लक्ष्य 19 व्या ओव्हरमध्ये गाठलं.

हेनरिक क्लासेन मधल्या फळीतील फलंदाज असून त्याने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या सीजनमध्ये क्लासेनने 13 सामन्यात 50.45 च्या सरासरीने 555 धावा केल्या आहेत. त्याला स्ट्राइक रेट 155 पेक्षा जास्तचा होता.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच