Virat Kohli Birthday : या कारणामुळे बीसीसीआयने विराटच्या वाढदिवसाच्या दिनी शेअर केली आकडेवारी

आज विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक आकडेवारी जाहीर केली आहे.

Virat Kohli Birthday : या कारणामुळे बीसीसीआयने विराटच्या वाढदिवसाच्या दिनी शेअर केली आकडेवारी
Virat Kohli Birthday
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 05, 2022 | 10:56 AM

नवी दिल्ली : आज विराट कोहलीचा (Virat Kohli) 34 वा वाढदिवस आहे. जगभरातल्या चाहते विराट कोहलीला कालपासून शुभेच्छा देत आहेत. आतापर्यंत विराट कोहलीच्या सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांचा महापूर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टार खेळाडू मॅक्सवेल याने सुद्धा विराट कोहलीला लाईव्ह शोमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा गोलंदाज शहनवाज दहानी याने देखील हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

आज विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये विराट कोहलीच्या आतापर्यंतच्या कामगिरीची आकडेवारी आहे. विराट कोहलीने एकूण 477 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 24350 धावा त्याने काढल्या आहेत. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 71 शतके झळकावली. विशेष म्हणजे ज्यावेळी टीम इंडियाने विश्वचषक जिंकला त्यावेळी तो टीमचा भाग होता.

विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत विराट कोहलीने चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या रोमांचक मॅचमध्ये विराट कोहलीने महत्त्वपुर्ण खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला. विश्वचषकातील उर्वरीत मॅचमध्ये विराट कोहलीने चांगली कामगिरी करावी अशा शुभेच्छा चाहते देत आहेत.