AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wasim Jaffer : वसीम जाफर यांनी विराट कोहलीच्या आयुष्यातील भळभळती जखम बनलेला तो विषय पुन्हा छेडला, सगळीकडे सुरु झाली चर्चा

Wasim Jaffer : विराट कोहलीच्या आयुष्यात एक दुखरी नस आहे, त्यावर प्रसिद्ध क्रिकेट एक्सपर्ट वसीम जाफर यांनी बोट ठेवलय. पुन्हा एकदा त्यांनी विषय छेडलाय. अजूनपर्यंत जाहीरपणे विराट यावर कधीच काही बोललेला नाही. त्यामुळे सत्य काय त्यावर फक्त अंदाजच बांधले जाऊ शकतात.

Wasim Jaffer : वसीम जाफर यांनी विराट कोहलीच्या आयुष्यातील भळभळती जखम बनलेला तो विषय पुन्हा छेडला, सगळीकडे सुरु झाली चर्चा
Virat Kohli Image Credit source: Reuters
| Updated on: Oct 12, 2026 | 1:06 PM
Share

विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीवर माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “कोहली ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमधून निवृत झाला, तो विषय अजून चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. विराट कोहलीमध्ये अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता होती.तो इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता” असं वसीम जाफर म्हणाले. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या निवृत्तीचा विषय जसा हाताळला, त्यावर विराट कोहली थोडा निराश दिसत होता असं वसीम जाफर आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले. “विराट कोहली सारख्या खेळाडूला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडियमवर येतात. त्याची लोकप्रियता सुद्धा भरपूर आहे. तो कसोटी क्रिकेट अजून खेळू शकला असता” असं जाफर म्हणाले. “विराट कोहली जो पर्यंत या विषयावर बोलणार नाही, तो पर्यंत ठामपणे काही बोलता येणार नाही” असं जाफर म्हणाले.

विराट कोहली टेस्टमधून निवृत्त होण्याआधी त्याच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. तो इंग्लंड दौऱ्यावर जाऊन कसोटी खेळण्यासाठी इच्छुक होता. जानेवारी 2025 मध्ये दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरण हा सुद्धा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तो कटिबद्ध असल्याचे संकेत होते. रिपोर्ट्सनुसार, एप्रिल 2025 मध्ये स्थिती बदलली. निवडकर्त्यांनी विराट कोहलीला कथितरित्या सांगितलं की,टीम मॅनेजमेंटची इंग्लंड दौऱ्यासाठी युवा कर्णधाराला पाठिंबा देण्याची योजना आहे. या सगळ्यामुळे निराश होऊन इंग्लंड दौऱ्यावर आपण जाणार नाही असं त्याने निवडकर्त्यांना सांगितलं. आपला निर्णय बदलण्यासाठी त्याला समजावण्याचा प्रयत्न झाला. पण यश मिळालं नाही.

चांगल्या कुटनितीने हाताळता येऊ शकतात

वसीम जाफर विराट कोहलीच्या इंग्लंड दौऱ्याचा उल्लेख करताना म्हणाले की, तो इंग्लंड सीरीजसाठी स्वत:ला तयार करत होता. अशावेळी त्याच्या निवृत्तीचा विषय चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. काही निर्णय आणि काही खेळाडूंशी संबंधित विषय चांगल्या कुटनितीने हाताळता येऊ शकतात असं वसीम जाफर यांचं म्हणणं आहे. जाफर यांच्यानुसार भारतीय क्रिकेटमध्ये अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. काही निर्णय यशस्वी ठरले. काही निर्णयांमुळे खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली.

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....