IND vs WI: ते पिचमुळे अवघड…मॅच गमावताच गंभीरने दिली नको ‘ती’ कारणं, चूक कबूल करायची सोडून…
Gautam Gambhir On Team India: भारतीय संघाने दुसरा टी-२० सामना वेस्ट इंडिजविरुद्ध गमावला. यानंतर आता गौतम गंभीर आक्रमक झाला आहे.

IND vs WI 2nd T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला. भारतीय संघाने २५० धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजला दिले होते पण विंडिंजने हे लक्ष्य पूर्ण केले, भारताला पराभवा धक्का मिळाल्यानंतर आता प्रशिक्षक गौतम गंभीर काय म्हणाले?
रांची येथील टी-२० सामन्यानंतर गंभीर म्हणाले की, “क्रिकेटमध्ये फक्त चौकार आणि षटकार मारणे महत्त्वाचे नाही. खेळ सुधारण्यासाठी बॅट आणि बॉल यांच्यात समान स्पर्धा असायला हवी. तुम्हाला बॅट आणि बॉल यांच्यात चांगली स्पर्धा नको आहे का? जर तुम्हाला फक्त चौकार आणि षटकार बघायचे असतील, तर आम्ही तेच दाखवू ना मग. पण जर तुम्हाला बॅट आणि बॉल दोघांचीही चांगलीच टक्कर पाहायची असेल तर, आम्ही ते दाखवू.”
भारतीय मुख्य प्रशिक्षकाने गोलंदाजांचा बचाव करत म्हटले की, “खेळाडू ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करतात आणि त्यांचे करिअर पणाला लागलेले असते. हे गोलंदाज आमचेच आहेत. त्यांचे करिअरही पणाला लागलेले आहे. त्यांनी ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली आहे. असे नाही की त्यांनी मेहनत केली नाही. त्यामुळे, सामना बरोबरीत झाला तर ते चांगले होईल. आणि आपल्याला अधिक चांगला क्रिकेटही पाहायला मिळेल.”
गंभीर म्हणाला, “अर्थातच, अशा परिस्थितीत गोलंदाजी करणे कठीण आहे. आम्हाला माहित आहे की दव असलेल्या सपाट खेळपट्टीवर गोलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. पण आम्हाला विरोधी संघाला रोखण्याचा मार्ग शोधावा लागेल, विशेषतः त्यांनी पहिल्याच षटकात दोन आणि पहिल्या सहा षटकांत तीन विकेट गमावल्यानंतर.”
भारताला चांगली सुरुवात करून देण्यासाठी तीन बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाज मयंक यादवचेही गंभीरने कौतुक केले. त्याने ताशी १४५ किमी पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आणि रोव्हमन पॉवेलला ताशी १४९.५ किमी वेगाने बाद केले. मयंक म्हणाला, “तो एक वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने तशीच गोलंदाजी केली पाहिजे. तो धीमा गोलंदाज नाही. जर तुम्ही १५० च्या वेगाने गोलंदाजी करू शकत असाल, तर १५० च्या वेगाने गोलंदाजी करा. जर तुम्ही १२० च्या वेगाने गोलंदाजी करू शकत असाल, तर १२० च्या वेगाने गोलंदाजी करा. त्यामुळे, जेव्हा तुम्ही वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असता, तेव्हा वेगवान गोलंदाजासारखी गोलंदाजी करणे ही तुमची जबाबदारी असते. त्याने आज तेच केले आणि म्हणूनच तो यशस्वी झाला.”