भारताला लढायला शिकवणाऱ्या सौरव गांगुलीचा बर्थ डे, मात्र BCCI कडून शुभेच्छाच नाहीत!

टीम इंडियाला लढायला आणि जिंकायला शिकवलेला कर्णधार म्हणून माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली ओळखला जातो. भारतीय क्रिकेटचा दादा असलेल्या सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे.

भारताला लढायला शिकवणाऱ्या सौरव गांगुलीचा बर्थ डे, मात्र BCCI कडून शुभेच्छाच नाहीत!
| Updated on: Jul 08, 2019 | 1:18 PM

Happy Birthday Saurav Ganguly मुंबई : टीम इंडियाला लढायला आणि जिंकायला शिकवलेला कर्णधार म्हणून माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली ओळखला जातो. भारतीय क्रिकेटचा दादा असलेल्या सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. नुकतंच काल भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा बर्थडे साजरा झाला. आयसीसीपासून बीसीसीआयपर्यंत सर्वांनी धोनीला शुभेच्छा दिल्या. पण सौरव गांगुलीला शुभेच्छा  देण्यास बीसीसीआय विसरली की काय, असा प्रश्न आहे. कारण दुपारी एकपर्यंत बीसीसीआयने गांगुलीला बर्थडेच्या शुभेच्छाच दिल्या नाही. एकीकडे आयसीसीने गांगुलीला शुभेच्छा दिल्या, पण बीसीसीआयने अजूनही त्याला शुभेच्छा देणारं ट्विट किंवा पोस्ट केली नाही.

गांगुली आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. बीसीसीआयने धोनीला रात्री 12 वाजताच ट्विट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र गांगुलीला शुभेच्छा न दिल्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीयवर टीका होत आहे.

आयसीसीने गांगुलीला शुभेच्छा देताना, फलंदाज, गोलंदाज, कर्णधार आणि कॉमेंटेटर असं म्हणत एक चेहरा आणि अनेक रुपं असं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये आयसीसीने गांगुलीचे फलंदाजी, गोलंदाजी, कर्णधार आणि कॉमेंट्री करतानाचा फोटो कोलाज शेअर केला आहे.


सौरव गांगुलीने आपल्या कारकीर्दीत टीम इंडियाला नवी दिशा दिली. गांगुली भारताकडून 113 कसोटी सामने खेळला. यामध्ये त्याने 16 शतकं, 35 अर्धशतकांसह 7212 धावा केल्या. कसोटीत त्याने 32 विकेट्सही घेतल्या.

वन डेमध्ये गांगुलीने 311 सामन्यात 22 शतकं, 72 अर्धशतकांसह 11363 धावा ठोकल्या. वन डेत गांगुलीने 100 विकेट्स पटकावल्या आहेत.