IND vs AFG: टीम इंडियाला झटका, बीसीसीआयला अचानक बदलावा लागणार संघ, धुरंधर खेळाडूच बाहेर, कारण काय?

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० मालिका सुरु होणार आहे. आता ऐनवेळी भारतीय संघात मोठा बदल झाला आहे.

| Updated on: Sep 10, 2026 | 9:02 AM
1 / 6
भारतीय संघ १३ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघ १३ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

2 / 6

वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या हर्षितचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याची उपलब्धता पूर्णपणे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होती.

3 / 6

हर्षित राणा इंग्लंड दौऱ्यात भारतासाठी शेवटचा खेळला होता. तेव्हापासून तो दुखापतीशी झुंज देत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, राणा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्याला मैदानावर परतण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.

4 / 6

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हर्षित राणाची निवड फिटनेसवर अवलंबून होती. हर्षितचा आशियाई खेळांसाठीच्या भारतीय संघातही समावेश करण्यात आला आहे, परंतु संघ व्यवस्थापन त्याच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही निर्णय घाईने घेणार नाही. ऐची-नागोया येथे होणाऱ्या आगामी आशियाई खेळांमधील राणाचा सहभागही अनिश्चित आहे.

5 / 6

हर्षित राणासोबतच, फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. मात्र, सुंदर आता पूर्णपणे तंदुरुस्त असून अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असेल.

6 / 6

भारतीय संघाला सर्वात मोठा दिलासा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाजी करणारा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांच्यामुळे मिळाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us