‘लाज वाटली पाहिजे..’, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटर खवळला, PM शहबाज शरीफ यांना सुनावलं

Pahalgam Terror Attack : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एका पाकिस्तानी क्रिकेटरने आपल्याच देशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने X वर एक पोस्ट केलीय. ही पोस्ट वाचल्यानंतर लक्षाय येतं की, पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचा त्याला दाट संशय आहे.

लाज वाटली पाहिजे.., पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटर खवळला, PM शहबाज शरीफ यांना सुनावलं
Pakistani Cricketers
Image Credit source: x
| Updated on: Apr 24, 2025 | 10:35 AM

जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जगभरात चर्चा आहे. या दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाच वातावरण आहे. तिथे पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटर दानिश कानेरियाने पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “जर, पाकिस्तान दहशतवाद्यांना शरण देतोय, दहशतवादाला प्रोत्साहन देतोय, तर असं करताना त्यांना लाज वाटली पाहिजे” असं दानिश कानेरियाने त्याच्या X अकाऊंटवर पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात लिहिलं आहे.

पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून Action सुरु झाली आहे. डिप्लोमॅटिक फ्रंटवर भारताने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पाकिस्तानच नुकसान आहे. जगातील अनेक देश आणि मोठमोठ्या नेत्यांनी पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आहे. आपण भारतासोबत असल्याच या देशांनी संदेश दिला आहे. संबंध सुधारण्याच्या पोकळ बाता करणाऱ्या पाकिस्तानकडून नको त्या वल्गना सुरु आहेत.

आपल्या देशाच्या उद्देशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं

पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कानेरियाने आपल्या देशाच्या उद्देशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. दानिश कानेरिया हा पाकिस्तानी हिंदू क्रिकेटर आहे. अनेक आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने पाकिस्तानच प्रतिनिधीत्व केलं आहे.

‘वास्तव काय आहे? हे त्यांना माहित आहे’

पाकिस्तानातील हा हिंदू क्रिकेटर दानिश कानेरियाने आपल्या देशावर संशय व्यक्त करताना एक्स हँडलवर लिहिलय की, “जर खरच पाकिस्तानचा पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात हात नाही, तर मग आमच्या पंतप्रधानांनी शहाबाज शरीफ यांनी निषेध का केला नाही? सैन्याला अचानक का हाय अलर्टवर रहायला सांगितलं? असं यासाठी कारण, त्यांना सत्याची कल्पना आहे. वास्तव काय आहे? हे त्यांना माहित आहे” “जर, पाकिस्तान दहशतवाद्यांना शरण देतोय, दहशतवादाला प्रोत्साहन देतोय, तर असं करताना त्यांना लाज वाटली पाहिजे” असं दानिश कानेरियाने स्पष्टपणे म्हटलं आहे.


दानिश कानेरिया पाकिस्तानसाठी 61 टेस्ट, 18 वनडे सामने खेळला आहे. 276 विकेट त्याच्या नावावर आहेत. दानिश कानेरिया लेग स्पिन गोलंदाजी करायचा.