AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trohpy 2026-27 : महाराष्ट्राच्या मुलाने रणजी ट्रॉफीमध्ये रचला इतिहास, 77 वर्षानंतर एकाडावात बनवल्या 400 धावा, 11 व्या नंबरच्या प्लेयरमुळे स्वप्न साकार

Ranji Trohpy 2026-27 : रणजी ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्राच्या मुलाने इतिहास रचला आहे. त्याने एकाडावात 400 धावा केल्या आहेत. यात 11 व्या नंबरच्या खेळाडूचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. त्याने सुद्धा कमाल केली.

Ranji Trohpy 2026-27 : महाराष्ट्राच्या मुलाने रणजी ट्रॉफीमध्ये रचला इतिहास, 77 वर्षानंतर एकाडावात बनवल्या 400 धावा, 11 व्या नंबरच्या प्लेयरमुळे स्वप्न साकार
chinmay sutar
| Updated on: Oct 19, 2026 | 6:23 PM
Share

सध्या रणजी करंडक2026-27 मध्ये दुसऱ्या राऊंडचे सामने सुरु आहेत. सोमवारी या टुर्नामेंटमध्ये एक नवीन इतिहास रचला गेला. मिजोरमचा फलंदाज चिन्मय सुतारने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात 400 धावांची खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील दुसरा खेळाडू बनला आहे. आधी बीबी निंबाळकर यांनी 1948-49 च्या सीजनमध्ये नाबाद 443 धावा केल्या होत्या. आता 77 वर्षानंतर पुन्हा एका फलंदाजाने असा कारनामा केलाय. इतिहासात सोनेरी अक्षराने त्याने आपलं नावं कोरलं आहे. चिन्मय सुतार 29 वर्षांचा आहे. सोमवारी सोविमा येथे नागालँड विरुद्ध सामना झाला. प्लेट ग्रुप मॅचमध्ये दुसऱ्यादिवशीच्या तिसऱ्या सत्रात त्याने 181 धावांच्या पुढे आपली इनिंग सुरु केली. सुतारने 517 चेंडूत 46 चौकार आणि सात षटकार लागवून नाबाद 400 धावा केल्या.

मिजोरमने चिन्मय सुतारच्या शानदार फलंदाजीनंतर 581/9 डाव घोषित केला. सुतारने या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मणिपूर विरुद्ध पहिल्याडावात 35 धावांवर आऊट झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये 99 धावा केल्या होत्या. सुतारने याचवर्षी जानेवारी महिन्यात विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध मुंबईकडून पहिला लिस्ट ए सामना खेळला होता. तो 2 रन्स बनवून आऊट झालेला. त्या सामन्यात यशस्वी जैस्वाल, मुशीर खान, तृषार देशपांडे, सिद्धेश लाड आणि शार्दुल ठाकूर सारखे प्लेयर होते. 2019 साली आशियाई क्रिकेट परिषदेच्या इमर्जिंग टीम्स कपमध्ये भारताच्या इमर्जिंग टीमचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

11 व्या नंबरच्या फलंदाजाचं महत्वाचं योगदान

सुतारने ही 400 धावांची खेळी केली, त्यात 11 व्या नंबरचा फलंदाज लालरेमपुइया छकछुआकने महत्वाची भूमिका बजावली. 392 धावांवर 9 वा विकेट गेल्यानंतर छकछुआकने एकबाजू लावून धरली. लालरेमपुइया 76 चेंडू खेळून नाबाद 14 धावा केल्या. अखेरच्या विकेटसाठी दोघांनी मिळून 189 धावांची भागीदारी केली. सुतारने एकाबाजूने दमदार फटकेबाजी चालूच ठेवली.

पृथ्वी शॉ, संजय मांजरेकर यांनी किती धावा केल्यात?

रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड निंबाळकरच्या नावावर आहे. त्यांनी 1948-49 च्या सीजनमध्ये नाबाद 443 धावा केल्या होत्या. त्यांच्याखालोखाल चिन्मय सुतार 400 धावांसह दुसऱ्या नंबरवर आहे. पृथ्वी शॉ (379) तिसऱ्या, संजय मांजरेकर (377) चौथ्या, एमवी श्रीधर (366) पाचव्या, तनाय अग्रवाल (366) सहाव्या, विजय मर्चेंट (359 नाबाद) सातव्या, समित गोहेल (359 नाबाद) आठव्या आणि वीवीएस लक्ष्मण (353) नवव्या स्थानावर आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष