
क्रिकेटचा महाकुंभ 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जगातील दिग्गज क्रिकेट आखाडे म्हणजे संघ यामध्ये सहभागी होतील. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. पण सध्या या पारंपारिक हाडवैऱ्याशी संबंध पाहता भारतीय संघाच सर्व सामने दुबईत होत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारतीय सामने होतील. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानवर आयसीसीने विश्वास दाखवला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी रोजी खेळण्यात येईल. त्यापूर्वी एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. कॉमेंट्रीबाबत मोठा ट्विस्ट समोर आले आहे.
8 संघाचा महाकुंभ
चॅम्पियन ट्रॉफीचा कुंभ मेळा 19 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. तर अखेरचा विजेता पदासाठीचा सामना 9 मार्च रोजी होईल. 8 संघांचा दोन गटात समावेश करण्यात आला आहे. एका गटात चार संघ असतील. आयसीसीने विजेता, उपविजेता, तसेच खेळाडूंसाठीचे बक्षीस जाहीर केले आहेत. यावेळी विजेत्याला घसघशीत बक्षीस मिळणार आहे. विजेता संघाला 20 कोटी तर उपविजेत्याला 10 कोटींची लॉटरी लागणार आहे. तर सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 1 कोटी रुपये देण्यात येतील. गेल्यावेळीच्या तुलनेत ही रक्कम 53 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचवेळी समालोचनाविषयी एक मोठी घोषणा केली आहे.
आता मराठीत ऐका कॉमेंट्री
आयसीसीने देशी क्रिकेट चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे. आता आयसीसी सामन्यांचे थेट प्रेक्षपण पाहताना, त्याचे समालोचन स्थानिक भाषेत ऐकता येईल. आतापर्यंत हिंदी अथवा इंग्रजीत सामन्यांची कॉमेंट्री होत होती. तर आता पहिल्यांदाच 9 भारतीय भाषांमध्ये (ICC Champions Trophy Streamed in 9 Languages) सामान्यांचे धावते समालोचन ऐकता येईल. तसे क्रिकेट लाईव्ह प्रक्षेपणात स्थानिक भाषेत कॉमेंट्री होईल.
CHAMPIONS TROPHY COMMENTARY WILL BE IN 9 LANGUAGES IN JIOHOTSTAR:
– English, Hindi, Marathi, Haryanvi, Bengali, Bhojpuri, Tamil, Telugu & Kannada. pic.twitter.com/azyw4FNhkG
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2025
जिओ हॉटस्टार ॲपवर लाईव्ही स्ट्रीमिंग होईल. तर स्पोर्टस 19 आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल. त्यावेली इंग्रजी, हिंदी भाषेसोबत मराठी, बंगाली, भोजपूरी, हरियाणवी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या 9 भाषांमध्ये समालोचनाचा आनंद घेता येईल. अस्सल मराठीत, रांगड्या भाषेत या सामन्यांच्या समालोचनाची मज्जा अनुभवता येईल.