ICC ODI Rankings : न्यूझीलंड सीरीजमध्ये खराब खेळला, त्याचा रोहित शर्माला आयसीसी रँकिंगमध्ये फटका बसला, अफगाणिस्तानच्या फलंदाजाने टाकलं मागे

ICC ODI Rankings : एकदिवसीय क्रिकेट मधील आयसीसीकडून फलंदाजांची रँकिंग जारी झाली आहे. यात टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा आणि मधल्या फळीत खेळणारा कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांना फटका बसला आहे.

ICC ODI Rankings : न्यूझीलंड सीरीजमध्ये खराब खेळला, त्याचा रोहित शर्माला आयसीसी रँकिंगमध्ये फटका बसला, अफगाणिस्तानच्या फलंदाजाने टाकलं मागे
Rohit Sharma
Image Credit source: Reuters
| Updated on: Nov 18, 2026 | 4:08 PM

न्यूझीलंड विरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये रोहित शर्माने अपेक्षेनुसार प्रदर्शन केलं नाही. खूप निराशाजनक कामगिरी केली. एकूण चार डावात त्याने फक्त 30 धावा केल्या. त्याचा फटका रोहितला वनडे रँकिंगमध्ये बसला आहे. आयसीसीने बुधवारी 18 नोव्हेंबरला ताजी रँकिंग जारी केली आहे. यात शुबमन गिल नंबर 1 वर आहे. विराट कोहलीच्या स्थानात काही बदल झालेला नाही. इंग्लंडचा फलंदाज टॉम बॅटनने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये फक्त एक बदल झाला आहे. रोहित शर्माची चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. रोहितचे 732 रेटिंग पॉइंट्स झाले आहेत. अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान पाचव्यावरुन चौथ्या नंबरवर पोहोचला आहे. शुबमन गिल 806 रेटिंग पॉइंटसह पहिल्या नंबरवर आहे. शुबमन गिल न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीजच्या तयारीसाठी चौथी आणि पाचवी वनडे खेळला नव्हता. डॅरेल मिचेल 778 रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या आणि विराट कोहली 757 पॉइंटसह तिसऱ्या नंबरवर आहे.

वनडे फलंदाजांच्या टॉप 10 रँकिंग लिस्ट मधून केएल राहुल बाहेर गेला आहे. तो 10 व्या वरुन 11 व्या नंबरवर गेला आहे. जो रुटच्या क्रमवारीत सुधारणा झालीय. 11 व्या स्थानावरुन तो 9 व्या नंबरवर आला आहे. पाकिस्तानचा बाबर आजम 9 व्या वरुन 8 व्या नंबरवर आला आहे. बेन डकेटचं नुकसान झालय. शाइ होपच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा झाली आहे. श्रीलंकेच्या कुशल मेंडिसच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा होऊन तो 10 व्या नंबरवर आला आहे.

Loading...

श्रेयस अय्यरला फटका

15 नोव्हेंबरला एडिलेडमध्ये इंग्लंडचा फलंदाज टॉम बॅटन ऑस्ट्रेलिया विरुद्ध 121 धावांची शानदार इनिंग खेळला होता. आयसीसीकडून याचं त्याला चांगलं इनाम मिळालं आहे. 34 व्या स्थानावरुन तो थेट 13 व्या नंबरवर पोहोचला आहे. विल यंगने सुद्धा तशीच मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा ओपनर यंग 45 व्या क्रमांकावरुन 30 व्या नंबरवर पोहोचला आहे. श्रेयस अय्यरच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. तो 23 व्या स्थानावर पोहोचलाय.

ICC टॉप 10 ODI फलंदाजांची रँकिंग

शुबमन गिल (भारत) – 806

डॅरिल मिचेल (न्यूजीलंड) – 778

विराट कोहली (भारत) – 757

इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) – 752

रोहित शर्मा (भारत) – 732

शाइ होप (वेस्टइंडीज) – 710

बेन डकेट (इंग्लंड) – 699

बाबर आजम (पाकिस्तान) – 661

जो रुट (इंग्लंड) – 652

कुशल मेंडिस (श्रीलंका) – 649

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us